नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे न्याय प्रशासनात गोंधळ : चिदंबरम   

नवी दिल्ली : तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्याची प्रक्रिया निरर्थक होती. या कायद्यांमुळे न्यायाधीश, वकील आणि पोलिसांसह न्याय प्रशासनात गोंधळ निर्माण झाला आहे, अशी टीका माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. नवीन कायदे बहुतेक ’कॉपी अँड पेस्ट’ आहेत. त्यात केवळ काही नवीन तरतुदी जोडल्या गेल्या आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठी सुधारणा म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चिदंबरम म्हणाले, नागरिकांचे सर्व हक्क सुरक्षित राहावे आणि कोणताही गुन्हेगार शिक्षेपासून वाचू नये, यासाठी नरेंद्र मोदी सरकारने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे नवीन कायदे लागू केल्याचे सांगितले.  
  
मी तीन विधेयकांची तपासणी करणार्‍या स्थायी संसदीय समितीला एक असहमती पत्र पाठवले होते. माझ्या असहमती पत्रात मी असा दावा केला होता की, संबंधित नवीन विधेयकाशी आयपीसी, सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायद्याच्या कलमानुसार तुलना केल्यानंतर आयपीसीच्या 90-95 टक्के, सीआरपीसीच्या 95 टक्के आणि पुरावा कायद्याच्या 99 टक्के कलम संबंधित नवीन विधेयकात कॉपी आणि पेस्ट केले गेले आहेत. या नवीन कायद्यांमुळे न्याय प्रशासनात गोंधळ निर्माण झाला आहे.
 

Related Articles