E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या करिअर व एज्युकेशन फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन व एज्युकेशन फेअरला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुकुंदनगर येथील संकुलात शनिवार आणि रविवार सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या फेअरमध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
फेअरमध्ये विद्यार्थ्यांसाठी मानसिक कल चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या चाचणीच्या आधारे त्यांचे छंद, क्षमता, आवडीनिवडी समजून घेऊन योग्य करिअर मार्गदर्शन देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही समाधान व्यक्त केले. विद्यापीठात सुरू असलेल्या पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच योग, आयुर्वेद, संस्कृत, जपानी भाषा, फिजिओथेरपी, नर्सिंग, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट आधुनिक व कौशल्याधारित अभ्यासक्रमांबाबत फोटोग्राफी, पत्रकारिता, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, ध्वनी व संगीत तंत्रज्ञान सविस्तर माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.
फेअरमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्यात आली. नव्या शैक्षणिक धोरणानुसार एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम शिकण्याची संधीही विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण क्षेत्रातील जागतिक बदल लक्षात घेऊन विद्यापीठाने देश-विदेशातील शैक्षणिक व औद्योगिक संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री एक्स्पोजर, इंटर्नशिप्स आणि रोजगाराच्या संधी अधिक मिळणार आहेत.
फेअरच्या दोन्ही दिवशी विद्यार्थ्यांनी विविध विभागांचे माहिती घेतली. अनेकांनी माहिती घेऊन ऑन-द-स्पॉट अर्ज सादर करत प्रवेश प्रक्रियेची सुरुवात केली. संगणकशास्त्र, मास कम्युनिकेशन, डिजिटल आर्ट, सोशल सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट, परकीय भाषा, संस्कृत, विधी, एमएसडब्ल्यू, बीएसडब्ल्यू इत्यादी अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.
Related
Articles
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय
08 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला
03 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय
08 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला
03 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय
08 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला
03 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय
08 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण
08 Jul 2025
हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला
03 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला