महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प   

वृत्तवेध 

पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून सध्या देशात कार्बन उत्सर्जनात घट आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करुन शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. राज्यात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी ‘महानिर्मिती’तर्फे १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.०’ अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.
 
महानिर्मिती ही १३,८८० मेगावॉट क्षमतेसह भारतातील सर्वांत मोठ्या राज्य-नियंत्रित विद्युत उत्पादकांपैकी एक आहे. ‘एनटीपीसी’नंतर (एनटीपीसी) देशातील दुसर्‍या क्रमांकाची राज्य मालकीची एनर्जी जनरेशन कंपनीतर्फे औष्णिक, वायू, जल व सौर अशा विविध स्रोतांतून ऊर्जानिर्मिती करून कमी दरात वीजपुरवठा करत कार्बन उत्सर्जन घटवण्यावर भर दिला जाणार आहे.
 
योजनेची उद्दिष्टे
 
* पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवणे आणि शाश्वत ऊर्जेचा वापर
* दिवसा अखंडित वीजपुरवठा करून शेतकर्‍यांची उत्पादनक्षमता वाढवण्याचे ध्येय
* २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी फीडरचे ‘सोलरायझेशन’चे उद्दिष्ट
* ०.५ ते २५ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प वितरण उपकेंद्राच्या ५-१० किलोमीटर परिघात उभारणे.
* जीईएपीपी सहकार्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून ‘जीईएपीपी इंडिया’ प्रकल्पासाठी पीएमयू (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट) व डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार
* माहिती संकलन, सद्य:स्थितीचे परीक्षण आणि सुलभ व्यवस्थापन शक्य होणार
* तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी
प्रकल्प व्यवस्थापन व देखरेख
* मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेबाबत मार्गदर्शनासाठी धोरणात्मक संयुक्त समिती स्थापन होणार आहे. ‘सेंट्रल डॅशबोर्ड’च्या माध्यमातून जमीन संपादन ते प्रकल्प प्रगतीचे दैनंदिन निरीक्षण
* सर्व भागधारकांसाठी प्रशिक्षण आयोजित करून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
* प्रकल्पामुळे नव्या रोजगारसंधींची निर्मिती होणार

Related Articles