E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या करिअर व एज्युकेशन फेअरला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
पुणे
: टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन व एज्युकेशन फेअरचा पहिला दिवस उत्साही वातावरणात पार पडला. मुकुंदनगर येथील ’टिमवि’च्या संकुलात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत हा मेळावा होत आहे. विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत माहिती घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या फेअरचे उद्घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टिमवि ट्रस्टचे सचिव अजित खाडीलकर, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फेअरमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मानसिक कल चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या छंद, क्षमता, आवडीनिवडी समजून घेऊन त्यांना योग्य करिअर मार्गदर्शन देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनीही समाधान व्यक्त केले.
विद्यापीठात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये योग, आयुर्वेद, संस्कृत, जपानी भाषा, फिजिओथेरपी, औषधनिर्माण शास्त्र, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट आणि वाणिज्य यांचा समावेश होता. याशिवाय विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे आधुनिक व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमही फेअरमध्ये मांडण्यात आले होते. फोटोग्राफी, पत्रकारिता व जनसंपर्क, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, ध्वनी व संगीत तंत्रज्ञान अशा अभ्यासक्रमांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती व सल्ला देण्यात आला.
या फेअरमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास त्यांना शुल्कामध्ये विशेष सवलत दिली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. याशिवाय नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थी एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. विद्यार्थी पत्रकारिता व जनसंपर्क या मुख्य अभ्यासक्रमासोबतच अॅनिमेशन किंवा संगीत तंत्रज्ञान यासारखा दुसरा पूरक अभ्यासक्रमही
शिकू शकतो.
शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर होणारे बदल लक्षात घेऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने उद्योगजगतातील अग्रगण्य संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकतानाच इंडस्ट्री एक्स्पोजर, इंटर्नशिप्स आणि नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध होणार आहेत.
हा करिअर मेळावा आज (रविवारी) सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
Related
Articles
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता
05 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
पेशव्यांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार
05 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
बुलडाण्याजवळ बसला अपघात; ३० वारकरी जखमी
08 Jul 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक
06 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता
05 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
पेशव्यांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार
05 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
बुलडाण्याजवळ बसला अपघात; ३० वारकरी जखमी
08 Jul 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक
06 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता
05 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
पेशव्यांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार
05 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
बुलडाण्याजवळ बसला अपघात; ३० वारकरी जखमी
08 Jul 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक
06 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती चीन पाकिस्तानला देत होता
05 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
पेशव्यांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार
05 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
बुलडाण्याजवळ बसला अपघात; ३० वारकरी जखमी
08 Jul 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक
06 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण