बुलडाण्याजवळ बसला अपघात; ३० वारकरी जखमी   

बुलडाणा : पंढरपूर येथून आषाढी वारी करून घराकडे निघालेल्या वारकर्‍यांच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ३० वारकरी व प्रवासी जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बुलडाण्यातील चिखलीजवळच्या महाबीज कार्यालयासमोर ही घटना घडली. 
 
भाऊसाहेब शोनाजी थांडे (वय ४५, रा. तळेगाव), पुष्पा विनोद शिंगणे  ३९, रा. तेल्हारा). प्रदीप रघुनाथ धर्मसकर (४८, रा. दहीगाव). विठ्ठल तुलसीराम पांडे (३७, रा. तळेगाव), रामप्रसाद हरिभाऊ पांडे (६०, रा. तळेगाव), सुरेश दिगंबरराव फोकमारे (६०, रा. सवदंरा), शोभा झोरे (६०, रा. जानोरी रोड), गोविंद वासुदेव पांडे (६०, रा. वडेगाव), तुकाराम पांडुरंग कोकरे (६९, रा. बाळापूर), ईश्वर हरिचंद्र मोरे (६५, रा. जवळा), रुख्मीना वसंत इंगळे (६२, रा. बाळापूर), सुजाता राहुल वानखेडे (३०, रा. चिखली), शिवाजी सुभाष जाधव (३२, रा. अन्वा), नर्मदा अवचित मोरे (४५, रा. मिराळवाडी, चिखली), आकाश अशोक डोके (४५, रा. मंगरुळ-नवघरे) यांच्यासह अन्य काहीजण जखमी आहेत. 
 
पंढरपूर ते खामगाव ही बस पंढरपूर येथून काही प्रवासी व वारकर्‍यांना घेऊन खामगावकडे निघाली होती. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास खामगाव चिखली रस्त्यावरील महाबीज कार्यालयाजवळ ही बस रस्त्यावरील दुभाजकावर आदळून बस उलटली. या भीषण अपघातात बसमधील  ३० जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी वारकर्‍यांना बुलडाणा व चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या बसमधून ५१ प्रवासी प्रवास करीत होते.जखमी ३० जणांची प्रकृती स्थिर असून, पांडुरंगाच्या कृपेनेच आम्ही या मोठ्या संकटातून वाचलो, अशी भावना अपघातातून बचावलेल्या भाविकांनी व्यक्त केली. 
 

Related Articles