पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार   

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी बॉम्बस्फोटात एका सहाय्यक आयुक्तांसह चार सरकारी अधिकारी आणि एक नागरिक ठार झाला. तर, 10 जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील मेळा मैदानाजवळ हा स्फोट झाला. 
 
सहाय्यक आयुक्त फैसल सुलतान यांच्या वाहनाला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक नूर हकीम, तहसीलदार वकील खान आणि कॉन्स्टेबल रशीद यांचा मृत्यू झाला.खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच, जखमींना त्वरित वैद्यकीय मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles