E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुलंच्या शब्द प्रवासाचा मी नि:शब्द सहप्रवासी : फडणीस
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
पुणे : पुलंच्या साहित्याला पूरक चित्रे रेखाटू शकलो हा माझा भाग्ययोग समजतो. पुलंच्या शब्द प्रवासाचा मी निःशब्द सहप्रवासी आहे, अशी भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केली.पुलंचा २५ वा स्मृतिदिन व सुनीताबाईंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कोरोना काळात बंद पडलेला ’ग्लोबल पुलोत्सव’ पुन्हा सुरु झाला आहे. या ’ग्लोबल पुलोत्सवा’निमित्त बालगंधर्व कलादालन येथे आयोजित महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी पु. ल. आणि त्यांच्या साहित्यास समर्पित केलेल्या व्यंगचित्रांच्या आणि चिंतामणी हसबनीस यांच्या ब्रेल चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी फडणीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
’कोहिनूर’ प्रस्तुत व ’लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप सो. लि’. आयोजित या महोत्सवाचे सह-प्रयोजक ’बेलवलकर सांस्कृतिक मंच’, ’लोकमान्य कल्चरल फाउंडेशन’ व ’प्रथमेश कन्स्ट्रुक्शन’ आहेत. या महोत्सवास ’एनएफडीसी- राष्ट्रीय चित्रपट संग्रहालंय’, ’कार्टूनिस्ट कंबाइन’ व ’महाराष्ट्र साहित्य परिषद’ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
याप्रसंगी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, ’कार्टूनिस्ट कंबाइन’चे अध्यक्ष संजय मिस्त्री, चित्रकार चिंतामणी हसबनीस, व्यंगचित्रकार कार्टुनिस्ट कंबाईनचे चारुहास पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सागर पवार यांनी काढलेल्या अर्कचित्राचे अनावरण फडणीस यांच्या हस्ते करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
पु. ल. आणि त्यांच्या साहित्यास समर्पित केलेले हे व्यंगचित्र प्रदर्शन पाहताना फडणीस भावूक झाले होते. यावेळी लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत सुधीर मोघे दिग्दर्शित ’या सम हा’ या पुलंवरील चित्रपटाचा आनंद फडणीस यांच्यासह उपस्थित रसिकांनी घेतला.
फडणीस म्हणाले, पुलं हे केवळ विनोदी लेखन करणारे साहित्यिक नव्हते, तर त्यांना सामाजिक प्रश्नांची देखील जाणीव आणि भान होते. सामाजिक भानाच्या अनुषंगाने त्यांचे काही स्वगत देखील होते. मात्र, ते स्वगत त्यांच्या विनोदी साहित्याला मिळालेल्या हशा आणि टाळ्यांच्या आवजात ऐकू गेले की नाही, अशी शंका येते.
महोत्सवाचे उद्घाटन
ग्लोबल पुलोत्सवानिमित्त एन. एफ. ए. आय. थिएटर येथे लोकमान्य सिल्व्हर विंडो क्लब प्रस्तुत पुलंना भावलेल्या चित्रपटांच्या विशेष महोत्सवाचे उद्घाटन काल दुपारी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकमान्य मल्टिर्पपज को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.चे सुशील जाधव, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार, मुकुल मारणे आणि आभा औटी आदी उपस्थित होते.
Related
Articles
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
धरण क्षेत्रात धुव्वाधार
07 Jul 2025
सत्येंद्र जैन ईडी कार्यालयात
04 Jul 2025
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
09 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
धरण क्षेत्रात धुव्वाधार
07 Jul 2025
सत्येंद्र जैन ईडी कार्यालयात
04 Jul 2025
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
09 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
धरण क्षेत्रात धुव्वाधार
07 Jul 2025
सत्येंद्र जैन ईडी कार्यालयात
04 Jul 2025
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
09 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
धरण क्षेत्रात धुव्वाधार
07 Jul 2025
सत्येंद्र जैन ईडी कार्यालयात
04 Jul 2025
मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज
09 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण