सत्येंद्र जैन ईडी कार्यालयात   

नवी दिल्ली : दिल्ली जल मंडळातील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात दिल्लीचे माजी मंत्री आणि ‘आप’ नेते सत्येंद्र जैन गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयात (ईडी) समोर हजर झाले.ईडीने जैन यांना समन्स बजावताना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार, जैन काल सकाळी सव्वा अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर, ईडीच्या अधिकार्‍यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
 
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जैन आरोग्य, उद्योग, वीज, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह आणि नगरविकास अशी खाती सांभाळली आहेत. जैन यांची अन्य दोन प्रकरणांतही ईडी चौकशी सुरू आहे. २०२२ मध्ये ईडीने त्यांना अटक देखील केली होती. अलीकडेच, ईडीने माजी उपमुख्यमंत्री आणि ‘आप’ नेते मनीष सिसोदिया यांसह जैन यांना सरकारी शाळांमधील वर्गखोली बांधकामातील कथित गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.नवीन प्रकरण दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित आहे. ईडीने गेल्या वर्षी जुलैमध्ये या प्रकरणात छापे घातले होते. 
 

Related Articles