E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जालन्यातील भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू
Samruddhi Dhayagude
19 May 2025
तिघांचा गंभीर, गाडीचा चक्काचूर
जालना : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीच्या जवळील सौंदलगाव फाटा परिसरात भीषण अपघात घडला. या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सोमवारी सकाळी घडली असून धुळ्याहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असलेल्या कारला सौंदलगाव फाट्याजवळ कार पलटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे लातूरचे असलेले चव्हाण कुटुंब सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यात आहे. हे कुटुंब काही कामानिमित्त लातूरकडे जात असताना धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोद्री जवळील सौंदलगाव येथे पोहोचल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटली. या अपघातात चव्हाण कुटुंबातील मायलेकीचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि जखमींतील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, गाडीचा वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा ही संभाव्य कारणे मानली जात आहेत.
मृतांची नावे:
नुरवी अमरदीप चव्हाण (वय अडीच वर्षे)
रोहिणी अमरदीप चव्हाण (वय ३० वर्षे)
जखमींची नावे:
अमरदीप बाबूराव चव्हाण (वय ४० वर्षे)
विश्रांती प्रदीप चव्हाण (वय २९ वर्षे)
रुद्रांश प्रदीप चव्हाण (वय २ वर्षे)
धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही महिन्यांत अपघाताच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. वाहनांचा अतिवेग हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याने वाहनचालकांनी वेगा बाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Related
Articles
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
वाचक लिहितात
28 May 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
वाचक लिहितात
28 May 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
वाचक लिहितात
28 May 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
वाचक लिहितात
28 May 2025
‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’
01 Jun 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात