इंफाळ : मणिपूरला बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यातील एकाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ नोंदवली गेली. तर, दुसर्याची तीव्रता ३.९ नोंदवली गेली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी आणि वित्तहानी झाली नाही, असे अधिकार्यांनी सांगितले. पहाटे १.५४ मिनिटांनी चुराचांद जिल्ह्याला ५.२ तीव्रतेचा धक्का जाणवला. त्यानंतर, २.२६ वाजता नोनी जिल्ह्याला २.५ तीव्रतेचा धक्का जाणवला. चुराचांदला काल सकाळी १०.२३ वाजता ३.९ तीव्रतेचा धक्क्का जाणवला. भूकंपानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली.
Fans
Followers