E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मार्केटयार्ड प्रवेशद्वारासमोर ’नो पार्किंग झोन’
Wrutuja pandharpure
18 May 2025
बाजार समितीचे वाहतूक पोलिसांना पत्र
पुणे
: मार्केटयार्डच्या प्रवेशद्वारावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या भागातील वाहतूक कोंडी फुटत नसल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे या मागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मार्केटयार्डच्या प्रवेशद्वारासमोर ‘नो पार्किंग झोन’ करण्याचा प्रस्ताव बाजार समिती प्रशासनाने वाहतूक पोलिसांना दिला आहे.
शिवनेरी रस्त्यावरील पेट्रोल पंप ते नवीन फुलबाजार या परिसरात नो पार्किंग झोन करण्याचा प्रस्ताव आहे. नो पार्किंग झोन झाल्यास बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वाहतूक सुटण्यास मदत होणार आहे. परिणामी शेतीमालाच्या गाड्या वेळेत बाजारात पोहचू शकतील. मार्केटयार्डमध्ये प्रवेश करण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतूक कोंडीमुक्त राहणे गरजेचे आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रथमच पुणे बाजार समितीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
शिवनेरी रस्त्यावर फळे व भाजीपाला, फुलबाजार, गूळ भुसार विभागाचे प्रवेशद्वार आहे. या रस्त्यावरून राज्यासह परराज्यातून शेतमाल आवक मोठ्या प्रमाणात होत असते. विशेषत: परराज्यातून येणारा माल मोठ्या वाहनांतून येत असतो. या रस्त्यावरील अतिक्रमण तसेच दोन्ही बाजूस पे अॅण्ड पार्क असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंग केली जाते. त्यात डबल पार्कीग होऊन निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे सातत्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. त्यावर उपाय म्हणून शिवनेरी रस्त्यावरील पेट्रोल पंप विभाग ते नियोजित फुलबाजार या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग झोन करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. याबाबत वाहतूक विभागाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
कोंडीबाबत लवकरच निर्णय
बाजार समिती प्रशासनाच्या वतीने बाजारात रस्त्यासह होणार्या कोंडीबाबत सर्व परिस्थिती वाहतूक विभागाला पत्राद्वारे कळविली आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच वाहतूक विभागाला सोयीस्कर ठरेल, असे केबिन पण तयार असून जागा निश्चित करून ते विभागाला उपलब्ध करून देण्यात येईल.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती
नो पार्किंग झोनचा प्रस्ताव
कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शिवनेरी रस्त्याची कोडी सोडविण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे. पेट्रोल पंप ते नवीन फूलबाजार ’नो पार्किंग झोन’ होणार करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला असून यावर योग्य तो निर्णय घेवून येथील वाहतूक कोंडी सोडवण्यात येईल.
- सचिन खेतमाळद, उपनिरीक्षक, मार्केटयार्ड पोलिस स्टेशन.
Related
Articles
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
श्रीलंकेच्या दोन माजी मंत्र्यांना तुरुंगवास
30 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
श्रीलंकेच्या दोन माजी मंत्र्यांना तुरुंगवास
30 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
श्रीलंकेच्या दोन माजी मंत्र्यांना तुरुंगवास
30 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करणार्यावर गुन्हा
30 May 2025
श्रीलंकेच्या दोन माजी मंत्र्यांना तुरुंगवास
30 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार