E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नीरज चोप्रा ९० मीटर पार
Wrutuja pandharpure
18 May 2025
दोहा
: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत वैयक्तिक विक्रम रचला आहे. नीरजने ९०.२३ मीटर भाला फेकत वैयक्तिक विक्रमाची नोंद केली. नीरज चोप्राला आतापर्यंत ९० मीटरचा टप्पा पार करता आला नव्हता. कालच्या स्पर्धेत त्याने हा टप्पा पार केला. नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८८.४४ मीटर भाला फेकला. तर, दुसर्या प्रयत्नात तो अपयशी ठरला, त्याचा प्रयत्न बाद ठरला.
नीरज चोप्रानं तिसर्या प्रयत्नात ९०.२३ मीटर भाला फेकला. नीरज चोप्राने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा ९० मीटरचा टप्पा पार केला आहे. भाला फेकमध्ये ९० मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची देखील नोंद झाली आहे. नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात ८०.५६ मीटर भाला फेकला. नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नापर्यंत पहिल्या स्थानावर होता. तर जुलियन वेबर ८९.०६ मीटरच्या भालाफेकीसह दुसर्या स्थानावर होता. जुलियन वेबरनं पाचव्या प्रयत्नात ९१ मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेकला यामुळं नीरज चोप्रा दुसर्या स्थानावर गेला. जुलियन वेबरनं ९१.०६ मीटर भाला फेकला.दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रासमोर अँडरस पीटर्स (ग्रेनाडा), जेकब वाडलेच ( झेक प्रजासत्ताक), ज्युलियन वेबर मॅक्स डेहनिंग (दोघेही जर्मनी), जुलियस येगो (केनिया), रॉड्रिक डीन (जपान) यांचं आव्हान आहे. पॅरिस ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम यानं दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग घेतला नाही.
नीरज चोप्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी यापूर्वी ८९.९४ मीटर होती. त्यानं ही कामगिरी २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये केला होता. नीरज चोप्रानं २०१८ मध्ये दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग घेतला होता, त्यावेळी तो चौथ्या स्थानावर राहिला होता. २०२३ मध्ये तो पहिल्या स्थानावर होता तर २०२४ मध्ये दुसर्या स्थानावर राहिला होता.दोहा डायमंड लीगमध्ये पहिल्या स्थानावर राहणार्या अॅथलीटला ८ अंक मिळतात. दुसर्या स्थानावर राहणार्या खेळाडूला ७ तर तिसर्या स्थानावर राहणार्या खेळाडूला ६ गुण मिळतात. चौथ्या स्थानावरील खेळाडूला ५ गुण तर डायमंड लीग २०२५ चा समारोप २७ आणि २८ सप्टेंबरला ज्यूरिख डायमंड लीगच्या फायनल सोबत होणार आहे. नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये केलेली कामगिरी त्याच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
Related
Articles
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
29 May 2025
मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालीन आराखडा तयार करा : शेलार
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
मान्सूनचा फटका पाच दिवसांत १६ जणांनी गमावले प्राण
30 May 2025
लोणावळ्यात पोलिस ठाण्याजवळील बंगल्यावर दरोडा
29 May 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
29 May 2025
मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालीन आराखडा तयार करा : शेलार
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
मान्सूनचा फटका पाच दिवसांत १६ जणांनी गमावले प्राण
30 May 2025
लोणावळ्यात पोलिस ठाण्याजवळील बंगल्यावर दरोडा
29 May 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
29 May 2025
मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालीन आराखडा तयार करा : शेलार
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
मान्सूनचा फटका पाच दिवसांत १६ जणांनी गमावले प्राण
30 May 2025
लोणावळ्यात पोलिस ठाण्याजवळील बंगल्यावर दरोडा
29 May 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
29 May 2025
मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालीन आराखडा तयार करा : शेलार
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
मान्सूनचा फटका पाच दिवसांत १६ जणांनी गमावले प्राण
30 May 2025
लोणावळ्यात पोलिस ठाण्याजवळील बंगल्यावर दरोडा
29 May 2025
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी