E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
Samruddhi Dhayagude
04 Jun 2025
अवकाळीच्या नुकसानीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा
मुंबई, (प्रतिनिधी) : मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील अनेक भागांत उभ्या पिकांप्रमाणेच कापणी केलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर फडणवीस यांनी कापणी झालेल्या पिकाची भरपाई विचाराधीन असल्याचे सांगितले.
वन मंत्री गणेश नाईक आणि बंदरे विकास मंत्री नीलेश राणे यांनी पावसामुळे सुक्या मासळीचे नुकसान झाले आहे, तरी मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाला यावर प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पावसामुळे रस्ते आणि छोट्या पुलांचे नुकसान झाले आहे. त्यांची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी केली. ग्रामविकास विभागाकडून ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. यावर गेल्या १५ दिवसांत ज्या भागात ‘रेड अलर्ट’ घोषित केला होता तेथील रस्ते आणि पूल दुरुस्ती बाबत विचार केला जावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
या बैठकीत मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतीची माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत घरांच्या पडझडींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी तातडीने मदतीकरिता निधी द्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार, ४९ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. कोकण विभागास पाच कोटी, पुणे विभागास १२ कोटी, नाशिक विभागास पाच कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागास १२ कोटी, अमरावती विभागास पाच कोटी आणि नागपूर विभागास दहा कोटी असे एकूण ४९ कोटी वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती सेठी यांनी दिली.
त्याचबरोबर खरीप २०२५ आणि यापुढील कालावधीसाठी केंद्र सरकार अथवा राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी द्यावयाची भरपाई दर आणि निकष २७ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार देय राहतील. यामुळे १ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचना रद्द करण्यात आल्या आहेत, असे सोनिया सेठी यांनी सांगितले.
दरम्यान, बैठकीत जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयात १४.५ टीएमसी, जायकवाडी धरणात २८ टीएमसी तर गोसीखुर्द धरणात ३.७२ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती दिली. तर राज्यातील पाणी टंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या गावांच्या संख्येत २०० ने तर टँकरच्या संख्येत ३३६ ने घट झाली आहे.
Related
Articles
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
शाळेची घंटा वाजली
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त