थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’   

हैदराबाद : हैदराबाद येथे झालेल्या ७२ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता हिने ’मिस वर्ल्ड २०२५’चा किताब पटकावला आहे. या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी सुचाता थायलंडची पहिलीच स्पर्धक ठरली आहे. मागील वर्षीची मिस वर्ल्डची विजेती क्रिस्टीना पिजाकोवा हिने ओपल सुचाताच्या मस्तकी मिस वर्ल्डचा मुकुट ठेवला. तेलंगणातील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये मिस वर्ल्डचा अंतिम सामना रंगला. त्यामध्ये इथिओपिया, पोलंड आणि मार्टिनिकमधील स्पर्धकांना हरवून ओपल सुचाता हिने मिस वर्ल्डचा मुकुट जिंकला. सुचाताच्या या यशानंतर थायलंडमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Related Articles