E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
पराभूत ‘किंगमेकर’!
Wrutuja pandharpure
18 May 2025
चर्चेतील चेहरे, राहुल गोखले
कॅनडामध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी लिबरल पक्षाने बाजी मारली; तर प्रतिस्पर्धी कंझर्वेटिव पक्षाला विजयाची संधी असूनही पराभव स्वीकारावा लागला. मात्र या निवडणुकीत खर्या अर्थाने धुव्वा उडाला तो न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचा (एनडीपी). त्या पक्षाला केवळ सात जागांवर विजय मिळाला. २०११ नंतर या पक्षाची सतत घसरण होत होती; मात्र आता झालेली घसरण ऐतिहासिक आहे. साहजिकच पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. जगमीत सिंग यांनी २०११ साली राजकारणात प्रवेश केला. एनडीपी पक्षात एकेक पायर्या चढत जगमीत सिंग यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळण्याचा टप्पा गाठला. पण त्या पक्षाची कामगिरी मात्र ते सुधारू शकले नाहीतच; उलट त्या पक्षासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण व्हावा अशा टप्प्यावर त्यांनी पक्षाला आणून ठेवले आहे. पक्षाच्या या सुमार कामगिरीत जगमीत सिंग यांच्या आडमुठ्या आणि आततायी भूमिकांचा मोठा वाटा आहे यात शंका नाही. त्यात त्यांनी स्वतः सुधारणा केली नाही तेंव्हा मतदारांनीच त्यांना त्यांची जागा दाखविली.
जगमीत सिंग यांचे कुटुंबीय पंजाबमधील बर्नाला येथील. जगमीत सिंग यांचे आई-वडील यांनी कॅनडात स्थलांतर केले. २ जानेवारी १९७९ रोजी जन्मलेले जगमीत सिंग यांचे बालपण स्कारबरो येथे गेले. वडील डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ होते. त्यामुळे घरची सुबत्ता असली तरी वडील मद्यपी असल्याने घरातील स्वास्थ्य मात्र बिघडलेले असायचे असे जगमीत सिग यांनी सांगितले होते. त्यातच वडील आजारी पडले आणि काही काळ अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. तेंव्हा जगमीत सिंग यांना चरितार्थासाठी काम करावे लागले. वडिलांची प्रकृती सुधारेपर्यंत जगमीत सिंग यांनी लहान-मोठी कामे करीत घराला सावरले. वर्णविद्वेषाच्या फटक्यातून देखील जगमीत सिग वाचू शकले नाहीत.
एकूण त्यांचे लहानपण अशा अनेक वाईट अनुभवांनी भरलेले होते. त्याचा परिणाम असावा; पण त्यांनी गरिबांसाठी; मानवाधिकारांसाठी लढण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीस ते वेस्टर्न ओन्टारियो विद्यापीठातून जीवशास्त्र विषयात पदवीधर झाले; तर त्यानंतर त्यांनी यॉर्क विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी टोरोंटो येथे फौजदारी वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. विंडसर, ओन्टारियो, मिशिगन येथे त्यांचे वास्तव्य राहिले आणि त्यामुळे विविध अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाले. तथापि त्यांनी राजकारणात प्रवेश करण्यास निमित्त ठरले ते मात्र अगदी निराळे होते. त्यांनी स्वतःच ते सांगितले असल्याने त्यावर शंका घेण्याचे कारण नाही.
कॅनडाचे एक मंत्री उस्साल दोसांझ यांनी कॅनडात शीख अतिरेकीवाद वाढत आहे असे विधान केले होते. त्यावेळी जगमीत सिंग यांना ते खटकले होते. त्यामुळेच आपण राजकरणात प्रवेश करण्यास उद्युक्त झालो असे जगमीत सिंग यांनी म्हटले होते. अर्थात त्यांच्या भावाने देखील त्यांना राजकारणात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र सुरुवातीपासून त्यांचा कल हा खलिस्तानवाद्यांकडेच राहिला आहे हेही त्यातून सूचित होते. २०११ मध्ये जॅक लेटन यांच्या नेतृत्वाखाली एनडीपी पक्षाने कॅनडाच्या केंद्रीय प्रतिनिधीगृहात तब्बल १०३ जागा जिंकल्या होत्या. त्याच वर्षी कॅनडाच्या एका प्रांताच्या विधिमंडळात जगमीत सिंग निवडून गेले होते. अल्पसंख्यांक समाजाचे ते पहिलेच प्रतिनिधी ठरले. त्यानंतर जगमीत सिंग यांनी मागे वळून पाहिले नाही. २०१५ मध्ये त्यांना पक्षाच्या ओन्टारियो शाखेचे उपप्रमुख नेमण्यात आले. २०१७ मध्ये एनडीपी पक्षाचे ते प्रमुख म्हणून निवडून आले. तोवर ते कॅनडाच्या केंद्रीय प्रतिनिधीगृहातही पोचले होतेच. २०१९ च्या पोटनिवडणुकतील विजयाने ते संसदेत पोचले. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आणि नंतर २०२२ च्या निवडणुकीत त्यांनी तो मतदारसंघ राखला. यंदा मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. अर्थात तोवर त्यांची कट्टरवादी भूमिका अनेकदा उघड झाली होती.
१९९३ मध्ये जगमीत सिंग यांनी भारतातील आपल्या मूळ गावाला भेट दिली होती; पण ते त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याअगोदर. २०१३ मध्ये त्यांनी भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला; तेंव्हा तो नाकारण्यात आला. नंतर त्यांनी पुन्हा एकदा अर्ज केला तो देखील नाकारण्यात आला. याचे कारण अर्थातच खलिस्तानवाद्यांविषयी त्यांना असणारी सहानुभूती. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भारतात शीखविरोधी हिंसाचार झाला होता. तो नरसंहार असल्याचे शब्द जगमीत सिंग यांनी वापरले होते. अद्याप त्यांची ती भूमिका कायम आहे. कॅनडाने देखील अधिकृतपणे तीच भूमिका स्वीकारावी म्हणूनही जगमीत सिंग यांनी सातत्याने प्रयत्न केले. २०१५ मध्ये त्यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका सभेत सहभाग घेतला होता. तेथे उघडपणे खलिस्तानवादी घोषणा देण्यात आल्या होत्या आणि व्यासपीठावर भिंद्रानवालेचे चित्र लावण्यात आले होते.
१९८५ मध्ये एअर इंडियाच्या विमानात दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्यात ३२९ जण ठार झाले होते; त्यांतील बहुतांशी कॅनडाचे रहिवासी होते. त्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तलविंदर सिंग परमारची चित्रे कॅनडातील गुरुद्वारा लावतात हे उचित आहे का हा प्रश्न जगमीत सिंग यांना पत्रकार टेरी मिलिवेस्की यांनी विचारला होता. तेंव्हा त्याचे गोलमाल उत्तर जगमीत सिंग यांनी दिलेच; पण कांगावाही केला. प्रश्न विचारणारा पत्रकार वर्णविद्वेषी असल्याचा आरोप करत जी घटना घडली तेंव्हा आपण लहान होतो; तेंव्हा त्याबद्दल प्रश्न आपल्याला विचारणे हे विचित्र आहे असा अजब पवित्रा त्यांनी घेतला होता. वास्तविक प्रश्नकर्त्या पत्रकाराचा उद्देश केवळ तुम्ही त्या घटनेचा निषेध करता किंवा नाही यावर मत जणू घेण्याचा होता; पण जगमीत सिंग यांनी स्पष्टपणे निषेध करणे टाळले. दोन वर्षांपूर्वी फुटिरतावादी नेता हरदीप सिंग निज्जरचा कॅनडातच खून झाला. तेंव्हा तत्कालीन पंतप्रधान जस्टिन त्रुदो यांनी त्यात भारतीय हस्तकांचा हात असल्याचा बिनबुडाचा आरोप केला होता. त्यामागे त्रुदो यांची राजकीय अपरिहार्यता होती; याचे कारण त्यांचे अल्पमतील सरकार जगमीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीच्या कुबड्यांवर तग धरून होते. निज्जरच्या खुनानंतर कॅनडाने भारताविरुद्ध निर्बंध लागू करावेत अशी मागणी जगमीत सिंग यांनी केली होती.
आपण ‘किंगमेकर’ आहोत हाच अहंगंड जगमीत सिंग यांना नडला आहे. वास्तविक २०१७ मध्ये त्यांची निवड एनडीपी पक्षाच्या नेतेपदाची झाल्यापासून एनडीपी पक्षाची कामगिरी सुमारच होत चालली आहे. लेटन यांच्या नेतृत्वाखालील कामगिरीची पुनरावृत्ती त्यांच्या नंतर पक्षप्रमुख झालेले टॉम मलकेयर यांनाही साधली नव्हती. पण जगमीत सिंग यांच्या कार्यकाळात तर ती घसरण वेगाने झाली.
२०१९ मध्ये एनडीपी पक्षाने प्रथमच जगमीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या. मात्र जगमीत सिंग याना वेध लागले होते ते पंतप्रधानपदाचे. पण पक्षाला अवघ्या २४जागा मिळाल्या आणि त्यांचे स्वप्न भंगले. २०२१ मध्ये झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत एनडीपी पक्षाला २५ जागा जिंकता आल्या; तेही काही भव्य यश नव्हते. पण त्रुदो सरकारला टेकू म्हणून त्या पक्षाला महत्व होते. त्या बदल्यात जगमीत सिंग यांनी आपल्या पक्षाच्या सर्वांना मोफत उपचार इत्यादी योजना पुढे रेटल्या. याच काळात जगमीत सिंग यांची काही मुद्यांवरील मते अधिकाधिक टोकाची होऊ लागली होती. २०२३ च्या ऑक्टोबर मध्ये हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. एनडीपी पक्षाची भूमिका नेहेमीच इस्रायलधार्जिणी राहिली आहे. पण जगमीत सिंग यांनी मात्र पॅलेस्टीनची बाजू घेऊन रोष ओढवून घेतला. खलिस्तानवादी समर्थकांना कायदेशीर मदत करण्याचा आरोप त्यांच्यावर झाला. गेल्या वर्षी जगमीत सिंग यांनी त्रुदो सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तेंव्हाही त्यांची अपेक्षा निवडणुकीत आपल्या पक्षाची कामगिरी लक्षणीय असेल आणि आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरू शकू अशीच होती. त्यांच्या या निर्णयाने सरकार जरी गडगडले नाही तरी त्रुदो यांना मात्र पायउतार व्हावे लागले. परिणामी मार्क कार्ने पंतप्रधान झाले. त्यांनी आपल्या पक्षाला पुन्हा सत्तेत पोचविले आहे. जगमीत सिंग यांच्या एनडीपी पक्षाचा मात्र धुव्वा उडाला. परिणामतः जगमीत सिंग यांना मात्र पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
२०१७ मध्ये कॅनडा मधील जागतिक शीख संघटनेने जगमीत सिंग यांचा गौरव केला होता तर टोरोंटो स्टार वृत्तपत्राने त्या शहरातील चमक असलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. वास्तविक जगमीत सिंग हे त्यांचा पोषाख, वक्तृत्वशैली यांमुळे समाजमाध्यमांवरही लोकप्रिय होते. पण त्या लोकप्रियतेला मर्यादा होत्या. यावेळी स्वतः जगमीत सिंग पराभूत झाले हा त्याचा पुरावा. आपण जितक्या टोकाच्या भूमिका घेऊ तितका कॅनडातील शीख समुदाय आणि भारतीयांचा पाठिंबा आपण मिळवू शकू असा त्यांचा कदाचित होरा असावा. पण तसे झाले नाही. आता त्यांच्या पक्षाच्याच नव्हे तर स्वतः जगमीत सिंग यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे यात शंका नाही. त्यांच्या या दारुण पराभवात कॅनडाच नव्हे तर जगभरात अतिरेकीावादाला राजकीय आश्रय देणार्यांसाठी धडा आहे!
Related
Articles
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात
07 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती
07 Jun 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात
07 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती
07 Jun 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात
07 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती
07 Jun 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात
07 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांच्या मेहुण्याकडे कोट्यवधींची संपत्ती
07 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?