E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
पुणे
: प्रभात बॅण्ड पथकाचे सर्वेसर्वा व प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक श्रीपाद मोरेश्वर सोलापूरकर यांचे बुधवारी सकाळी ह्दविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरूवारी) सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मागील काही महिन्यांपासून सोलापूरकर हे आजारी होती. काल सकाळी अकराच्या सुमारास ह्दयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सोलापूरकर यांचे पार्थिव आज सकाळी ८.३० ते १० या वेळेत केळकर रस्त्यावरील त्यांच्या राहत्या घरी अंत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
श्रीपाद सोलापूरकर यांना पं. बंडोपत सोलापूरकर यांच्याकडून वादनाचे धडे मिळाले. सुमारे ५० वर्षे ते वादन क्षेत्रात कार्यरत होते. १३ जुलै २०१५ रोजी सोलापूरकर यांनी बालगंधर्व रंगमंदिरात सलग ७ तास ५५ मिनिटांत ५५ गाणी सॅक्सोफोनवर वाजविली. त्याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी असंख्य चित्रपटांसाठी पार्श्ववादन केले आहे.
गेल्या ४० वर्षात ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून त्यांनी देश आणि विदेशात वादनाचे हजारो प्रयोग केले आहेत. तसेच त्यांनी वादनाचे प्रशिक्षण देऊन हजारो विद्यार्थी घडविले आहेत. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीत त्यांनी अनेक वर्षे वादन सेवा दिली आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती, अखिल मंडई, बाबू गेनू मंडळासाठीही प्रभात बॅण्डच्या माध्यमातून श्रीपाद सोलापूरकर यांनी वादन केले आहे. तसेच केसरीवाडा गणेशोत्सवात त्यांनी त्यांच्या वाद्यवृंदासह वादन कला सादर केली आहे.
Related
Articles
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !