वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू   

भोर तालुक्यातील खुटवडवस्तीमधील घटना

भोर,(प्रतिनिधी) : घरातील पाण्याची मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसलेल्या एका तरूणाचा खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे-सातारा महामार्गावरील कामथडीच्या खुटवड वस्तीमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.राजेंद्र चंद्रकांत खुटवड (वय ३६) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
 
याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अशोक ज्ञानोबा खुटवड यांनी पोलिसांना खबर दिली.पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार राजेंद्र रहात्या घरासमोर ठेवलेली पाण्याची मोटार सुरू करत होता. दरम्यान विजेचा जोरदार शॉक बसल्यामुळे तो बेशुध्द पडला. स्थानिकांनी तातडीने नसरापूर येथील खासगी रूग्णालयात  दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भोर येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छदेन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली  पुढील तपास सुरू आहे.
 

Related Articles