E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
महिला आयोगाकडे तक्रार
पुणे
: महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला वैद्यकीय अधिकार्याची भाजपच्या एका पदाधिकार्याकडून काही महिन्यांपासून छळवणूक सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिका आयुक्त आणि महिलांच्या तक्रार समितीकडून दखल न घेतल्यामुळे या अधिकार्याने थेट आता राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आयोगाने याची दखल घेतल्याचे समोर आले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकारानंतर महिलांच्या छळवणुकीचा पुन्हा चर्चेत आला आहे. केवळ कौटुंबिकच नाही तर कामाच्या ठिकाणीही महिलांची छळवणूक होत असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला वैद्यकीय अधिकार्याने केलेल्या तक्रारीवरून उजेडात आले आहे.
भाजपच्या एका आघाडीच्या अध्यक्षाकडून गेल्या पाच महिन्यांपासून या महिला अधिकार्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. याबाबत संबधित महिला अधिकार्याने जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करून त्यांच्यावर झालेली आपबिती सांगून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली होती. मात्र, आयुक्तांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर संबधित अधिकार्याने महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार समितीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर केवळ सुनावणी झाली, पुढे काय कारवाई झाली हे समितीकडून कळविण्यात आले नाही.
दरम्यान भाजपच्या संबधित पदाधिकार्याकडून कार्यालयात येऊन त्रास देण्याचा प्रकार सुरूच असल्याने अखेर आता या महिला अधिकार्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन आयोगाच्या अधिकार्यांनी नुकतीच महापालिकेत येऊन अधिकार्याकडून माहिती घेतली असल्याचे या अधिकार्याकडून सांगण्यात आले. दरम्यान महापालिकेच्याच वरिष्ठ अधिकार्यांची अशी छळवणूक होत असेल आणि तक्रारीनंतरही न्याय मिळत नसेल तर दाद कोनाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुरक्षा विभागाने केली होती पोलिसात तक्रार
महापालिकेच्या आवारात गोंधळ घालणे, अधिकार्यांना अरेरावी करणे, याविरोधात महापालिका प्रशासनाने याच पदाधिकार्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसात तक्रार देवून सुध्दा काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर सुध्दा हा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा घोळका घेवून महापालिका अधिकार्यांच्या दालनात गोंधळ घालत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. एका अधिकार्याने तर त्रासाला कंटाळून राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. महापालिका आयुक्त, पोलिस यांनी या पदाधिकार्यावर कारवाई केली. त्यामुळे आता सत्ताधारी भाजप यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related
Articles
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
स्टंटबाजी करणार्या तरुणाच्या मोटारीचा अपघात
11 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
स्टंटबाजी करणार्या तरुणाच्या मोटारीचा अपघात
11 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
स्टंटबाजी करणार्या तरुणाच्या मोटारीचा अपघात
11 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
स्टंटबाजी करणार्या तरुणाच्या मोटारीचा अपघात
11 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक