E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पर्यटकांनी गजबजला कास तलावाचा परिसर
Samruddhi Dhayagude
14 May 2025
सातारा, (प्रतिनिधी) : कास पठार परिसरात विशेषतः कास तलावावर पर्यटकांची गर्दी होत असून, अनेक जण कुटुंबासह निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. निसर्गाच्या सहवासात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून पर्यटकांची कास तलावावर गर्दी होत आहे. परिसरात पर्यटकांच्या कास तलाव परिसर गजबजला आहे.
निसर्गरम्य परिसरामुळे कासला पर्यटकांची सतत वर्दळ असते. मंगळवार, शनिवार, रविवार, तसेच सलग सुटीच्या दिवशी पर्यटक कुटुंबासमवेत फिरण्यास येत असून, कास तलावावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. पर्यटक कुटुंबासमवेत या परिसरात फिरण्यास येत असून, हिरव्यागार दाट झाडी झुडपांचा निवारा घेत भोजनाचा आनंद घेताना दिसत आहेत.
झाडाचा निवारा शोधून गाडीतील डेकवर नृत्याचाही आनंद घेत आहेत. ठिकठिकाणी तरुणाई संगीताच्या तालावर ठेका घेत थिरकताना दिसत आहेत. चिमुकले देखील छोट्या छोट्या खेळात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे. वयोवृद्ध मंडळीही आपल्या नातवंडासमवेत खेळात मग्न होतानाचे चित्र दिसत आहे. बहुसंख्य पर्यटक सेल्फी, तसेच फोटोसेशन करताना दिसत होते. कास तलाव परिसरात जांभळांची झाडे मोठ्या प्रमाणात असून, हा रानमेवाही आकर्षण ठरत आहे. त्याचबरोबर करवंद, आंबुळक्या, आंबे, फणस ही आजूबाजूच्या परिसरात असून, त्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत आहे.
कास परिसरात पर्यटनास आल्यावर मन प्रसन्न होते. कास परिसर नेहमीच भुरळ घालत असून, या परिसरात कुटुंबासमवेत पर्यटनासाठी आम्ही नेहमीच येत असतो, असे पर्यटक सचिन पवार यांनी सांगितले.
Related
Articles
करुण नायरचे द्विशतक
01 Jun 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
वाचक लिहितात
29 May 2025
करुण नायरचे द्विशतक
01 Jun 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
वाचक लिहितात
29 May 2025
करुण नायरचे द्विशतक
01 Jun 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
वाचक लिहितात
29 May 2025
करुण नायरचे द्विशतक
01 Jun 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
वाचक लिहितात
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
6
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव