E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेटविश्वाला आणि आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. मॅक्सवेलने त्याच्या १३ वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीला निरोप दिला आहे. मॅक्सवेलने सोमवारी ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली, २०१२ मध्ये पदार्पणापासून त्याने त्याच्या १४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास ४ हजार धावा केल्या आहेत.
३६ वर्षीय मॅक्सवेलने त्याच्या १३ वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी केल्या आणि ऑस्ट्रेलियाला दोनदा (२०१५ आणि २०२३) एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी १४९ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ३३.८१ च्या सरासरीने ३९९० धावा केल्या. या दरम्यान, त्याने ४ शतके आणि २३ अर्धशतके ठोकली. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांची नाबाद खेळी, जी एकदिवसीय इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते. या खेळीत, मॅक्सवेलने ९१/७ च्या धावसंख्येतून सावरत ऑस्ट्रेलियाला विजयाकडे नेले, जे एक चमत्कारिक कामगिरी होती. मॅक्सवेलने गोलंदाजीतही योगदान दिले आणि कारकिर्दीत ७२ बळी घेतले.
ग्लेन मॅक्सवेलने एका पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या काही सामन्यांनंतर मी कदाचित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असेल. मला वाटले की मी स्वतःला त्या सामन्यांसाठी तंदुरुस्त आणि तयार होण्याची चांगली संधी दिली. लाहोरमध्ये खेळलेला पहिला सामना आम्ही कठीण आउटफिल्डवर खेळलो आणि त्या सामन्यापासून मी खूप अस्वस्थ होतो.
ग्लेन मॅक्सवेलने या पॉडकास्टमध्ये २०२३च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या त्याच्या डावाची आठवण केली. तो म्हणाला, अफगाणिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात आउटफिल्ड ओले होते, जिथे आम्ही ५० षटके क्षेत्ररक्षण केले होते आणि शेवटच्या सामन्यानंतर मी योग्यरित्या तयार नव्हतो. मला जाणवू लागले की जर एकदिवसीय क्रिकेटमध्ये परिस्थिती माझ्यासाठी योग्य नसेल, तर कदाचित माझे शरीर त्याचा सामना करण्यास संघर्ष करेल. तिथे राहणे कठीण काम होते. मला वाटले की मी माझ्या संघाला निराश करत आहे, कारण माझे शरीर परिस्थितीवर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत होते, त्याबद्दल मी देखील खूश नव्हतो.
मॅक्सवेलला म्हणाला, २०२७ चा वर्ल्ड कप लक्षात ठेवून त्यांना त्यांच्या जागी दुसरा पर्याय शोधावा लागेल आणि त्यावर काम करावे लागेल. त्याने याबद्दल अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्याशी बोलला. तो म्हणाला, आम्ही २०२७ च्या वर्ल्ड कपबद्दल बोललो. मी त्यांना सांगितले की मला वाटत नाही की मी २०२७ चा वर्ल्ड कप खेळू शकेन. मला वाटते की आता माझ्या जागी इतर पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.
Related
Articles
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक