E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
Wrutuja pandharpure
28 May 2025
पॅरिस
: अलीकडच्या काळात संघर्ष करावी लागणारी इगा श्वीऑटेक आणि स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात करताना अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली. चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी श्वीऑटेक गतविजेतीदेखील आहे.
विशेष म्हणजे सलग तीन वर्षे ती विजेती आहे. महिला एकेरीत या स्पर्धेत आतापर्यंत कुणीही चार विजेतीपदे मिळविलेली नाहीत. मोनिका सेलेस आणि जस्टिन हेनिन यांनीही येथे सलग तीन विजेतीपदे मिळविलेली आहेत.मात्र, सलग चौथ्या विजेतेपदापासून दोघीही वंचित राहिल्या. त्यामुळे या ऐतिहासिक कामगिरीकडे कूच करताना श्वीऑटेकने पहिल्या फेरीचा अडथळा १ तास २४ मिनिटांत पार केला. श्वीऑटेकने सेंटर कोर्टवर झालेल्या सामन्यात ४२व्या स्थानावरील रेबेका स्रामकोवाचा ६-३, ६-३ असा पराभव केला. विशेष म्हणजे श्वीऑटेक २०२४ मध्ये येथे विजेतेपद मिळविल्यापासून एकाही स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचलेली नाही. श्वीऑटेकची गाठ आता एमा रॅडुकानूशी पडणार आहे.
रॅडुकानूने तीन सेटच्या लढतीत चीनच्या वँग शिन्यूचा प्रतिकार ७-५, ४-६, ६-३ असा मोडून काढला. महिला एकेरीतील अन्य सामन्यात एलिना रायबाकिनाने ज्युलिया रिएराचे आव्हान ६-१, ४-६, ६-४ असे मोडून काढले. नवव्या मानांकित एमा नवारोला मात्र पहिल्या फेरीत जेसिका मॅनेइरोकडून ०-६, १-६ असा पराभव पत्करावा लागला.
अल्कराझलाही विजयासाठी फार प्रयत्न करावे लागले नाहीत. अल्कराझने पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या गिउलिओ झेपिएरीवर ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळवला.
पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला डॅनिए अल्टमेअरकडून ५-७, ६-३, ३-६, १-६ असा पराभव पत्करावा लागला. विसाव्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने टोमास मार्टिन एचेवेरीचे आव्हान ७-५, ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. सातव्या मानांकित कॅस्पर रुडने पहिला अडथळा पार करताना अल्बर्ट रामोस विनोलासवर ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळविला.
Related
Articles
व्हाइट हाउसमध्ये मुनीर (अग्रलेख)
20 Jun 2025
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली
21 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरली
23 Jun 2025
जागतिक पोलिस! (अग्रलेख)
25 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
20 Jun 2025
तीन लाखांहून अधिक प्रवाशांचा मेट्रो प्रवास
22 Jun 2025
व्हाइट हाउसमध्ये मुनीर (अग्रलेख)
20 Jun 2025
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली
21 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरली
23 Jun 2025
जागतिक पोलिस! (अग्रलेख)
25 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
20 Jun 2025
तीन लाखांहून अधिक प्रवाशांचा मेट्रो प्रवास
22 Jun 2025
व्हाइट हाउसमध्ये मुनीर (अग्रलेख)
20 Jun 2025
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली
21 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरली
23 Jun 2025
जागतिक पोलिस! (अग्रलेख)
25 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
20 Jun 2025
तीन लाखांहून अधिक प्रवाशांचा मेट्रो प्रवास
22 Jun 2025
व्हाइट हाउसमध्ये मुनीर (अग्रलेख)
20 Jun 2025
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीची सावली
21 Jun 2025
अमेरिका युद्धात उतरली
23 Jun 2025
जागतिक पोलिस! (अग्रलेख)
25 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
20 Jun 2025
तीन लाखांहून अधिक प्रवाशांचा मेट्रो प्रवास
22 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा
2
नव्या युद्धामुळे चिंता
3
बोईंगचेच जास्त अपघात का?
4
चिराग यांचे दबावाचे राजकारण?
5
नव्या युद्धाचे संकट
6
पाच वाहनांचा विचित्र अपघात