E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
करुण नायरचे द्विशतक
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
लंडन
: इंग्लंड लायन्सविरुद्ध सुरु असलेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज करुण नायरने तडाखेबाज पुनरागमन करत जबरदस्त द्विशतक झळकावले आहे. ३० मे पासून खेळल्या जाणार्या ४ दिवसांच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने शतक झळकावले. त्याच वेळी, दुसर्या दिवसाचा खेळ सुरू होताच, या धडाकेबाज फलंदाजाने द्विशतक झळकावले. करुण उत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२५ मध्येही त्याने उत्तम खेळी खेळून प्रसिद्धी मिळवली. आता इंग्लंडच्या भूमीवर नायरची बॅट जोरात बोलत आहे. त्याने २७२ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले.
सामन्याच्या दुसर्या दिवशी द्विशतक झळकावल्यानंतरही करुण नायर फलंदाजी करत आहे. त्याने २७२ चेंडूत २०३ धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या खेळीदरम्यान, त्याने आतापर्यंत २६ चौकारांसह १ षटकार मारला आहे. त्याचा स्ट्राइक रेट देखील १२८.५७ आहे. भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी नायरने धमाका केला आहे. तो या आगामी कसोटी मालिकेचा देखील एक भाग आहे. बर्याच काळानंतर त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. तो ८ वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. यापूर्वी नायरने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे.
नायर व्यतिरिक्त सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनीही शानदार फलंदाजी केली. सरफराज खानने ११९ चेंडूत ९२ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामध्ये १३ चौकारांचा समावेश होता. जुरेलनेही या सामन्यात ११ चौकार आणि १ षटकारासह ९४ धावा केल्या, दोन्ही फलंदाज शतक हुकले. भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, भारतीय अ संघाने १०३ षटकांत ५ गडी गमावून ४७४ धावा केल्या आहेत.
२० जूनपासून भारत आणि इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारताने आधीच आपला अ संघ इंग्लंड दौर्यावर पाठवला आहे. या भारत अ संघात असे ७-८ खेळाडू आहेत, जे भारतीय कसोटी संघात देखील आहेत. यामध्ये करुण नायरचाही समावेश आहे, त्याला संघात घेतले तर टीम इंडियासाठी ’ट्रम्प कार्ड्सचा एक्का’ ठरले. करुण नायर व्यतिरिक्त, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकूर हे देखील भारत अ संघातील खेळाडू आहेत जे नंतर भारतीय कसोटी संघात सामील होतील.
Related
Articles
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !