E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मंचर एसटी आगाराची अक्कलकोट बस सेवा सुरू
Samruddhi Dhayagude
12 May 2025
मंचर, (प्रतिनिधी) : मंचर एसटी आगाराने मंचर अक्कलकोट एसटी बस भाविकांच्या सेवेसाठी रविवारी सुरू केल्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावातील भाविकांची सोय झाली आहे, अशी माहिती आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ भक्त गण मोठ्या प्रमाणात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोसरी मोशी इत्यादी भागात आहे. परंतु येथून अक्कलकोट येथे जाण्यासाठी थेट बस नसल्याने येथील भाविकांना पुणे येथे जाऊन दुसर्या एसटी बसने अक्कलकोट येथे जावे लागत होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सूचना केल्याप्रमाणे अक्कलकोट एसटी बस सुरू झाली आहे. अशी माहिती मंचर बस स्थानक प्रमुख साधना कालेकर यांनी दिली .मंचर येथे एसटी बसचा शुभारंभ श्रीफळ फोडून आंबेगाव तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील यांच्या हस्ते आणि सचिव प्रतापराव हिंगे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी एसटीचे वाहतूक नियंत्रक सलील सय्यद, छगन शेवाळे,वसंत लोखंडे, चालक दीपक शिंत्रे, वाहक गणेश जगदाळे आणि मनसेचे वैभव बांधखेले उद्योजक विनायक भोर यांच्यासह प्रवासी उपस्थित होते. मंचर एसटी बस स्थानक येथून सकाळी नऊ वाजता एसटी बस सुटून वाकडेवाडी, स्वारगेट, सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे पाच वाजता पोहोचणार आहे.
पुन्हा दुसर्या दिवशी सकाळी अक्कलकोट येथून सकाळी सात वाजता एसटी बस सुटून पुणे मार्गे मंचर येथे दुपारी तीन वाजेपर्यंत येणार आहे. अशी माहिती मंचर एसटी आगाराचे वाहतूक अधीक्षक पांडुरंग मुठे यांनी दिली. प्रवाशांनी जास्तीत जास्त एसटीद्वारे प्रवास करून आपली सुरक्षितता वाढवावी, असे आवाहन आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांनी केले.
Related
Articles
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
हगवणे याच्या घरावर शेणसडा
28 May 2025
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
02 Jun 2025
अतिवृष्टीबाधित शेतकर्यांना दोन हेक्टरपर्यंतच मदत
03 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात