यूएईचे १० फलंदाज शून्यावर रिटायर्ड बाद   

बँकॉक : क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक दिवस कोणता ना कोणता चमत्कार पाहायला मिळतात. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, पण आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप पात्रता सामन्यात असे काही घडले, जे यापूर्वी कधीही पाहिले किंवा ऐकले नव्हते. हा सामना युएई आणि कतार महिला संघात खेळला गेला.  
 
आयसीसी महिला टी-२०विश्वचषकाच्या आशिया विभागीय पात्रता स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात कतार महिला संघ आणि कतार महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात असा पराक्रम घडला जो कदाचित आजपर्यंत क्रिकेटमध्ये कधीच घडला नसेल. यूएईचे १० फलंदाज शून्य धावांवर रिटायर्ड आऊट झाले. तरीही, युएईने १६३ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात युएईचे ९ आणि कतारचे ८ फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत.  
 
या सामन्यात यूएई प्रथम फलंदाजी करत होता. संघाने १६ षटकांत १९२ धावा केल्या होत्या. यानंतर, खराब हवामानामुळे यूएई क्रिकेट संघाने आपल्या सर्व फलंदाजांना रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. पण, टी-२० स्वरूपात डाव घोषित करण्याचा कोणताही नियम नाही. या सामन्यात सर्व खेळाडू पॅड घालून मैदानावर पोहोचले आणि त्यांनी स्वतःहून रिटायर्ड आऊटचा निर्णय घेतला. क्रिकेटमध्ये असे कधीही पाहिले गेले नाही, जेव्हा एकाच संघाचे ११ फलंदाज रिटायर्ड आऊट झाले. पण यूएई संघानेही असाच एक पराक्रम केला आणि सामना जिंकला. २० षटकांत १९३ धावांचे लक्ष्य गाठताना कतार संघ फक्त २९ धावांवर ऑलआउट झाला. कतारच्या ८ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. कतारकडून रिझफा बानो इमॅन्युएलने २९ चेंडूत २० धावा केल्या. याशिवाय अँजेलिना मेरने ५ धावा आणि शाहरीन बहादूरने २ धावा केल्या. याशिवाय कतारचे ८ फलंदाज शून्य धावांवर बाद झाले.

Related Articles