जालंधरमध्ये अज्ञात वस्तूचा स्फोट   

अमृतसर, होशियारपूरमध्ये वाजले सायरन 

चंडीगढ : भारत आणि पाकिस्तानातील संघर्षादरम्यान पंजाबच्या पठाणकोट आणि जालंधर जिल्ह्यांत अज्ञात वस्तूचा स्फोट झाला. त्यानंतर, होशियारपूर, अमृतसर आणि फिरोजपूर जिल्ह्यांमध्ये सायरन वाजले, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
हरयानाच्या सिरसा येथेही काही स्थानिकांनी मध्यरात्रीनंतर स्फोटासारखे आवाज ऐकल्याचा दावा केला. जालंधर जिल्ह्यातील कंगनीवाल गावात एका निवासी भागात काल पहाटे एक क्षेपणास्त्र कोसळले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेत एक स्थलांतरित कामगार जखमी झाला. तर परिसरातील काही घरांचे नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास एका घराच्या पाण्याच्या टाकीवर अज्ञात वस्तू पडली. त्यामुळे ४ ते ५ घरांच्या काचा फुटल्या, असे परिसरातील एका महिलेने सांगितले. यामध्ये एक स्थलांतरित कामगार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles