E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मी कसोटीमधून निवृत्त झालो तरी एकदिवसाचे सामने खेळणार : रोहित शर्मा
Wrutuja pandharpure
09 May 2025
मुंबई
: इन्स्टाग्रामवर कसोटी कॅपसह फोटो शेअर करीत रोहितने लिहिले, ’सर्वांना नमस्कार...मी केवळ सर्वांना सांगू इच्छितो की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. आता आगामी काळात मी एकदिवसाचे सामने खेळत राहणार आहे.
पांढर्या जर्सीत देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी फार सन्मानाची बाब ठरली. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे, असे रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्मा याने ६ नोव्हेंबर २०१३ रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने तेव्हापासून गेली १२ कसोटी संघांचं प्रतिनिधित्व केले
तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. रोहितने ६७ कसोटी सामन्यांमधील ११६ डावांमध्ये ५७.०८ या स्ट्राईक रेटने आणि ४०.५८ च्या सरासरीने ४ हजार ३०२ धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान ८८ षटकार आणि ४७३ चौकार लगावले. रोहितने १२ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत १८ अर्धशतके, १२ शतके आणि १ द्विशतक झळकावले होते. रोहितची २१२ ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढे भारतीय संघासाठी एकदिवसाच्या सामन्यांचे क्रिकेट खेळत राहणार असल्याचे देखील रोहित शर्माने स्पष्ट केले. रोहित शर्माच्या या तडकाफडकी निवृत्तीच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी निवृत्तीबाबत एक योगायोग समोर आला आहे. एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटचे दिग्गज राहिले आहेत. रोहित शर्मा आणि एमएस धोनीचे भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. याचवेळी एमएस धोनी आणि रोहित शर्माच्या निवृत्तीमध्ये काही साम्य असल्याचे दिसून येत आहे.एमएस धोनी अन् रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीचे सेम टू सेम टाइमिंग एमएस धोनी आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून घेतलेली वेळ- संध्याकाळी ७.२९ वाजता एमएस धोनी आणि रोहित शर्माने शेवटची आंतरराष्ट्रीय कसोटी सामना भारतात मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळला होता.
निवृत्तीनंतर रोहित शर्माचे कुटुंबिय भावनिक
ऑस्ट्रेलिया दौर्यात भारताच्या पराभवापासून हिटमॅन चर्चेत होता. आता जूनमध्ये होणार्या इंग्लंड दौर्यापूर्वी, हिटमॅनने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या निर्णयामुळे त्याची पत्नी रितिकाही दुःखी झाली. तिने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट पोस्ट केली, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने अनेक इमोजी आहेत, त्यापैकी एक तुटलेल्या हृदयाच्या इमोजी आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. अनेक क्रिकेटपटूंनी हिटमॅनबद्दल पोस्टही केल्या आहेत.
Related
Articles
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
05 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
05 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
05 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
31 May 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
05 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी