शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण   

पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडीतील नाल्यावरच अतिक्रमण करुण सुलभ शौचालय उभारले आहे. तर नेहरुनगर मधील नाल्यावरच स्वच्छतागृह उभारले आहे. अजमेरा रोडवरील फुटपाथवरच मुतारी उभारली आहे. सर्व सामान्य नागरीकांनी उभारलेल्या घरांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाई करतात. आता सर्व सामान्य नागरीक विचारत आहेत की, महापालिकेवर कारवाई कोण करणार? असा सवाल नागरीक करीत आहेत. 
 
(छायाचित्र : अरुण गायकवाड)

Related Articles