E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मेंदूला सक्षम करण्याचा पासवर्ड आपल्याकडेच...
Samruddhi Dhayagude
08 May 2025
मानस शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांचे मत
पुणे : आपल्या मेंदूला सतत सकारात्मक विचाराचे खाद्य देऊन क्रियाशील ठेवायला हवे. मेंदूला स्वस्त बसू न देता आवडणार्या विषयात गंतवून ठेवा. नकारात्मक विचारापासून दूर राहून आपला मेंदू सक्षम कसा राहील, असा विचार करा. मेंदू सक्षम करण्याचा पासवर्ड आपल्या जवळच आहे, तो पासवर्ड शोधता आला पाहिजे, असे मत मानस शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी व्यक्त केले. मेंदूच्या कार्याप्रणालीबद्दल श्रोत्यांना जागरुक केले. व्यक्तिमत्व विकासासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हे डॉ. पानसे यांनी सांगितले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील ‘गौरीताई टिळक स्मृती’ व्याख्यानात ‘मेंदूचा पासवर्ड’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे बोलत होत्या. प्रारंभी वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते डॉ. श्रुती पानसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पानसे म्हणाल्या, दैनंदिन जीवनात वावरताना नेहमी सकारत्मक विचार आपण करायला हवा. आपल्या मेंदूला खूष ठेवण्यासाठी सतत सकारात्मक विचार करा. आपल्या आवडणार्या विषयात काम करा. वेळोवेळी पाणी प्या. दुसर्यांचे कौतूक करा, आणि शेवटी झोपताना सकारात्मक विचार करा. हे सर्व नियम आपण जर पाळले तर मेंदूत आनंदी रसायन तयार होते. त्यासाठी कोणतेही औषध घेण्याची गरज आपल्या भासणार नाही, असेही यावेळी अनेक उदाहरणे देऊन सांगितले.
सध्या लहानांपासून ते मोठ्यापर्यंत मोबाईल वापरण्याचे भान आपल्याला राहिले नाही. त्यात सध्याची पिढी अडकून पडली आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे आपण मुलांच्या हाती मोबाईल दिला. मात्र तो नंतर आपल्याला काढून घेता आला नाही, तो आता काढता आला पाहिजे. मुलांचा स्क्रिनटाईम वाढल्याने बौद्धिक क्षमतेबरोबरच निर्णय घेण्याची क्षमता त्यांची खुंटली आहे. मेंदूतील ग्रे मॅटरचा व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम आणि मोबाईल तसेच इंटरनेट व्यसनांचा मेंदूवर होणारा प्रभाव यावर पानसे यांनी जागरुक केले.
स्तःला नेहमी कामात गंतवून ठेवा, त्यामुळे आपल्यात नकारत्मक भावना येत नाही. मन कोठे रमत नसेल, तर जागा बदलत राहा. निसर्गात फिरा, जून्या आठवणीत रमा, आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या गोष्टी करा. गाणी ऐका, नवनवीन तंत्रज्ञान शिका, माणसे जोडा, बोलत रहा, यामुळे तुमच्या मेंदूला सकारात्मक उर्जा मिळून मेंदूचे आयुष्य वाढण्यात मदत होते, असे अनेक उदाहरणे देऊन पानसे यांनी मेंदूचा पासवर्ड उघडून दाखवण्याचा प्रयत्न यावेळी केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अंबर बेहरे यांनी केले.
माणसे जोडण्याबरोबरच बोलणे शिका
आपल्या मेंदूला एकाजागी बसायला आवडत नाही. मेंदूला सतत सकारात्मक विचार द्या. माणसे जोडण्याबरोबरच बोलणे शिका. सध्या आपणास मोबाईल वापरण्याचे भान राहिले नाही. नकळत आपण यात भरपूर वेळ यात घालवतो. या मोबाईल वापराने आपल्या मेंदूत आपण कचरा भरत असून मेंदूला सडवतो आहे. याचा परिणाम दहा ते पंधरा वर्षानंतर दिसून येतो. त्यामुळे मेंदूच्या आजारात अडकण्याआधी मेंदूला सक्षम करण्यासाठी जागे व्हा, असे आवाहन यावेळी डॉ. श्रुती पानसे यांनी केले.
Related
Articles
शेअर बाजार घसरला
31 May 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
अंकिता भंडारीच्या खून प्रकरणी तिघांना जन्मठेप
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात