E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
जेसीबी मशीन फसवणूक
राजगुरूनगर
, (वार्ताहर) : जेसीबी व्यवहारात ११ लाख ७० हजारांची फसवणूक केल्यावरून लता हगवणे आणि शशांक हगवणे या माय-लेकांना येथील प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी जे. बी. म्हस्के यांनी मंगळवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.लता हगवणे हिच्या नावावर असलेल्या जेसीबी मशीनचा व्यवहार ठरवून येळवंडे यांनी बँकेच्या हप्त्याचे ५० हजार दरमहा शशांकला दिले होते. मात्र, शशांकने कोणताही हप्ता न भरता, प्रत्यक्षात रिकव्हरी एजंटच्या मदतीने जेसीबी मशीन परत ताब्यात घेतले.
येळवंडे हे पैसे किंवा जेसीबी परत मिळावा, यासाठी शशांककडे गेल्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.या प्रकरणाच्या तपासासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना शशांक आणि लता हगवणे हवे होते. मात्र, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात शशांक आणि लता यांना अटक झाली होती. ते न्यायालयीन कोठडीत होते. या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी काल ताब्यात घेतले. त्यानंतर, दुपारी राजगुरुनगर न्यायालयात हजर केले.
जेसीबी मशीन खरेदीची मूळ कागदपत्रे आरोपींकडे आहेत, व्यवहार पूर्ण झाल्यावर ते नंतर देऊ, असे ते वारंवार म्हणत आले. त्यामुळे, आम्ही ते आत्ताच सादर करु शकत नाही, असे सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले. तर तपासी अधिकारी म्हणाले, येळवंडे यांच्या तक्रारीनंतर आरोपी हगवणे याने जबाब दिला होता. यामध्ये जेसीबी व्यवहारही कबुल केला आहे.
यावर हगवणे याचे वकील म्हणाले, जेसीबी अथवा इतर मशिन भाडे तत्वावर दिली जातात. त्याप्रमाणे जेसीबी भाडे तत्वावर दिला, विक्री केली नाही. उलट येळवंडे यांनी मशीनचे अपुरे भाडे दिले. त्यांनी जेसीबी खरेदी केला असेल तर करारनामा कुठे आहे? किमान फोटो कॉपी तरी हवी होती? आता कुठली तरी कागदपत्रे सादर करुन हगवणे यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे. हगवणे बंदूक परवानाधारक आहे, हे माध्यमांसमोर आलेले आहे. उलट, ५ ते १० लाख येळवंडे यांच्याकडून येणे बाकी आहे. हगवणे कुटुंबाला जास्तीत जास्त तुरुंगात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. बँकेचा जो एजंट आहे, त्याकडे स्वतंत्र चौकशी करता येऊ शकते. यासाठी हगवणे यांना पोलिस कोठडीची आवश्यकता वाटत नाही. तर, हगवणे माय-लेकाला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली.
Related
Articles
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
12 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
12 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
12 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
12 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक