फिजिओथेरपी : रूग्णांसाठी एक नवसंजीवनी   

फिजिओथेरपी विभाग 

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे जयंतराव टिळक कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि इंदूताई टिळक कॉलेज ऑफ फिजिओथेरपी गेली २० वर्षांपासून भौतिकोपचार (फिजिओथेरपी) शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. ’रूग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ मानून महाविद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी नेहमीच रूग्ण सेवेसाठी तत्पर आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात फिजिओथेरपी गरजेची असून बदलत्या काळानुरूप तिचा अंगिकार करणे आवश्यक आहे. सध्या मानवी जीवनपद्धती कोलमडली असून त्यामधून निर्माण होणारे ताण-तणाव, शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी अशा विविध प्रकारच्या तक्रारींवर फिजिओथेरपी ही रूग्णासांठी एक नवसंजीवनी आहे. 
 
महाविद्यालयात सध्या ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी फिजिओथेरपी संबंधित शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ३५ हून अधिक उच्च शिक्षित शिक्षक कार्यरत आहेत. सुसज्ज इमारती, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्यावत उपकरणे यांचा समावेश आहे. महाविद्यालयामध्ये बीपीटी (BPT) हा पदवी तर एमपीटी (MPT) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दोन्ही अभ्यासक्रम हे एम.एस.ओ.टी.पी.टी (MSOTPT) परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक सरावासाठी शहरातल्या नामवंत रूग्णालयांसोबत महाविद्यालयाचे सलग्नीकरण आहे. उदा - रूबी रूग्णालय, कमला नेहरू रूग्णालय, आर्कस रूग्णालय, राव रूग्णालय, रांका रूग्णालय, नोबल रूग्णालय, SCHOOL (Society of community oriented operationl links) इत्यादी. या रूग्णालयामध्ये Clinical Posting च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक सराव घेण्यात येतो. रूग्णसेवेसोबतच आमच्या व्यवसायाशी निगडीत असलेली सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन विभागामार्फत विविध मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन दरवर्षी केले जाते. 
 
आजपर्यंत लाखांहून अधिक रूग्णांना फिजिओथेरपी या उपचार पद्धतीचा लाभ मिळालेला आहे. या सोबतच वंचित आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या देवदासींसाठी अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था आणि सहेली संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करून जास्तीत जास्त देवदासींना त्याचा फायदा झाला. वृद्धमित्र या संस्थेसोबत आपली संस्था गेली चार वर्षे रूग्णसेवेसाठी कार्यरत आहे. पुणे शहरातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या वयोवृद्ध नागरिकांसाठी विभागातर्फे रूग्णसेवा दिली जाते. या सर्व कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल मा. रमेश बैस यांच्याकडून विभागाचा गौरव करण्यात आला. कोरोना काळात एक हजाराहून अधिक रूग्णांना फिजिओथेरपी उपचार पद्धतीचा फायदा झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या फिजिओथरेपी ओपीडी (बाह्य रूग्ण विभाग) मध्ये विविध व्याधी आणि आजारांवर उपचार दिले जातात. यात पक्षाघात, सांध्याचे विकार, विविध शारीरिक वेदना, श्‍वसन आणि हृदयाचे विकार, वयोमानानुसार होणार्‍या व्याधी व विकार, प्रसुतीनंतरची काळजी इत्यादी. ओपीडीमध्ये दर महिन्याला ९० पेक्षा अधिक रूग्ण उपचार घेतात.

Related Articles