E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पुतीन वेडे झालेत...
Samruddhi Dhayagude
27 May 2025
युक्रेनवरील ड्रोन हल्ल्यामुळे ट्रम्प संतापले
वॉशिंग्टन : रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन वेडे झाले आहेत, अशी जोरदार टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. रशिया आणि युक्रेन युद्धात रशियाने प्रथमच युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. हल्ल्यासाठी ३५५ ड्रोन रशियाने वापरले होते. गेल्या तीन वर्षांतील युद्धात शेकडोच्या संख्येने ड्रोनचा वापर केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुतीन यांच्यावर खवळले. त्यांनी पुतीन वेडे झाल्याची टीका केली.
ते म्हणाले, युक्रेन आणि रशियामध्ये शांततापूर्ण तोडगा काढला जावा. युद्धबंदी होऊन तीन वर्षांपासूनचे सुरू असलेले युद्ध थांबावे, यासाठी मी खटाटोप करत आहे. दुसरीकडे पुतीन यांनी युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. ही बाब वेडेपणाची आहे. दरम्यान रशियाने युक्रेनच्या हवाई दलाच्या संपर्क विभागावर मोठा ड्रोन हल्ला केला. ड्रोनमधून बाँबफेक केली होती. युक्रेनच्या अधिकार्यांनी सांगितले की, रशियाने नऊ क्रू्रझ क्षेपणास्त्रांचा वापर देखील हल्ल्यासाठी केला. प्रामुख्याने नागरी वस्तीला लक्ष्य करण्यासाठी ती वापरली होती. त्यात काही नागरिक जखमी झाले असून प्राणहानी झालेली नाही.
दरम्यान, रविवारी रात्री युक्रेनची राजधानी किव्हवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा रशियाने केला होता. त्यात १२ नागरिकांचा मृत्यू झाला होता त्या हल्ल्यासाठी ६९ क्षेपणास्त्रे आणि विविध प्रकारचे २९८ ड्रोन वापरण्यात आले होेते. त्या आकडवारीबाबत रशियाने मौन पाळले आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने युरोपीय महासंघ युद्धबंदी व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तोडगा निघालेला नाही. दोन्ही देश ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून हल्ले चढवत आहेत. यामुळे डोनाल्ड ट्रम्प वैतागले असून त्यांनी आता माझा संयम सुटत चालल्याची प्रतिक्रिया दिली. मी पुतीन यांच्यासोबत चांगले संबंध जोडण्यास इच्छुक आहे. पण पुतीन यांना नेमके काय झाले आहे ? हे मला माहीत नाही. पुतीन वेडे झाले आहेत, अशी पोस्ट त्यांनी समाज माध्यमांवर टाकून खंत व्यक्त केली आहे.
ते म्हणाले,. पुतीन अकारण नागरिकांना ठार करत आहेत. क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा हल्ला हे त्याचेच उदारहण आहे. युक्रेनची राजधानी किव्हसह अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ला केला आहे. कारण काहीही असले तरी हा पुतीन यांचा शुद्ध वेडेपणाच म्हणावा लागेल. आक्रमक हल्ले पाहता रशियाला युक्रेन जिंकायचे आहे, असे वाटते. त्यामुळे रशियाचे नुकसान आणि पाडाव होईल, असा इशारा त्यांनी दिला. युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनाही त्यांनी फटाकरले आहे. ते युद्ध करुन युक्रेनचे प्रचंड नुकसान करत आहेत. रशियासोबत चर्चा ते करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
Related
Articles
तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान
18 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान
18 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान
18 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान
18 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !