बद्रिनाथ मंदिर भाविकांसाठी खुले   

पंधरा टन फुलांची आरास 

बद्रिनाथ : उत्तराखंडमधील बद्रिनाथ मंदिर रविवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले. चमोली जिल्ह्यात मंदिर असून सहा महिन्यांनंतर मंदिराचे दरवाजे काल उघडण्यात आले.मंदिर सुमारे १५ टन फुलांनी सजविले होते. पहाटे सहा वाजता वैदिक मंत्रांच्या उच्चारात  मंदिराची दारे उघडण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारची सुमारे १५ टन फुलांचा वापर सजावटीसाठी केला होता.
 
याप्रसंगी लष्कराच्या वाद्यव्रृदांनी समुधूर धून वाजवली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी,भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट, टेहरीचे आमदार किशोर उपाध्याय उपस्थित होते. मुख्य पुजारी रावल, धर्माधिकारी अणि वेदपाठी यांनी विशेष पूजा या प्रसंगी केली.  बद्रिनाथ मंदिरासह गणेश, घंटकर्ण, आदि केदारेश्वर, आदी गुरु शंकराचार्य  मंदिर आणि माता मारुती मंदिर या बद्रिनाथ धाम परिसरातील मंदिरांचे दरवाजे उघडण्यात आले असून ती आता भाविकांसाठी खुली करण्यात आली. दिवाळीनंतर चारधाम यात्रेतील बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमनोत्री मंदिराची दारे बंद केली जातात.  सहा महिन्यानंतर एप्रिल आणि मे दरम्म्यान मंदिरांचे दरवाजे उघडले जातात. यापूर्वी केदारनाथ मंदिराचे दरवाजे गेल्या शुक्रवारी उघडले होते. महिना अखेरीस गंगोत्री आणि यमनोत्री मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत. 

Related Articles