भारत-अफगाणिस्तानमध्ये व्यापारावर चर्चा   

संबंध दृढ करुन भारत गुंतवणूक वाढविणार 

काबूल : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारत व पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार जवळ आले आहे. तालिबानचे परराष्ट्रमत्र्यांनी भारतीय शिष्टमंडळाची काबुल येथे भेट घेतली असून राजकीय आणि व्यावसायिक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या वेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तेव्हा त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. 
 
अफगाणिस्तानातील भारताचे वरिष्ठ मुत्सद्दी आनंद प्रकाश यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. या वेळी मुत्ताकी यांनी भारतीय गुंतवणूकदारांना अफ गाणिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. भारताबरोबर आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. 
 
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश यांनी मुत्ताकी यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. तालिबान सरकारला भारताने अजूनही मान्यता दिलेली नाही. तेथे सर्वसमावेशक सरकार स्थापन केले पाहिजे, असे भारताचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर  कोणत्याही देशाला दहशतवाद पसरवण्यासाठी दिला जाऊ नये, अशी यासाठी भारत आग्रही आहे. अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देण्याचेही समर्थन भारताने केले आहे.  दरम्यान, अमीर मुत्ताकी यांनी भेटीच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत संबंध अधिक मधुर करण्यासंदर्भातील पाच पोस्ट एक्सवर केल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान भारतासोबत संबंध वाढविण्यावर अधिक भर देत असल्याचे स्पष्ट होत आहे. 
 
प्रकाश यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील विविध प्रक़ल्पात भारत गुंतवणूक करण्यास तयार आहे. त्यात पायाभूत सुविधांचा समावेश आहे. रेेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावण्यास भारत सर्व ते सहकार्य करणार आहे. द्विपक्षीय संबंध वाढविण्याबरोबरच शिष्ट मंडळाच्या भेटी गाठी वाढविणे,  व्हिसाबाबतचे प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत. 
 

Related Articles