E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कमी गुण मिळाल्याने जन्मदात्यानेच मुलीला मारले बेदम
Samruddhi Dhayagude
23 Jun 2025
सांगलीमध्ये वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू
सांगली : वडील-लेकीचे अतिशय हळवे नाते असते, पण या नात्याला काळिमा फासणारी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आणि कमी गुण मिळाल्याबाबत कारण विचारल्यावर उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या वडिलांनी केलेल्या बेदम मारहाणीत जखमी होऊन या मुलीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत मुलीचे वडील हे स्वत: एका शाळेत शिक्षक आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. साधना धोंडीराम भोसले असे संबंधित मुलीचे नाव असून, ती बारावीमध्ये शिकत होती.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत साधना ही सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील रहिवासी होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या साधनाला दहावीमध्ये तब्बल ९२.६० टक्के गुण मिळाले होते. नुकत्याच झालेल्या नीटच्या चाचणी परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले साधनाचे वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला. ‘’नीटच्या सराव परीक्षेत एवढे कमी गुण कसे काय मिळाले, अशाने तू डॉक्टर कशी होणार?’’ अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा साधनाने ‘’तुम्हालाही कमी गुण मिळायचे, तुम्ही तरी शिकून कुठे कलेक्टर झालात?’’, असे उलट उत्तर वडिलांना दिले.
साधनाने उलट उत्तर दिल्याने वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला. संतप्त झालेल्या धोंडीराम यांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला बेदम मारहाण केली. तेव्हा त्यांच्या पत्नीने मध्ये पडून त्यांना थांबवले. मात्र काही वेळाने त्यांनी साधना हिला पुन्हा मारहाण केली. एवढंच नाही तर शुक्रवारी रात्रभर ते तिला मारहाण करत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते उठून शाळेत योग दिनाच्या कार्यक्रमाला गेले होते. घरी परतल्यावर साधना ही त्यांना बेशुद्धावस्थेत दिसली.
त्यानंतर घाबरलेल्या धोंडीराम भोसले यांनी साधना हिला सांगली येथील दवाखान्यात उपचारांसाठी नेले. साधना ही बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे सांगत त्यांनी तिला उपचारांसाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपचार घेण्यापूर्वीच साधना हिचा मृत्यू झाला. त्यानंतर साधनाचे शवविच्छेदन केल्यावर तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी आणि आईने दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षक असलेले वडील धोंडीराम भोसले यांना पोलिसांनी अटक केली.
Related
Articles
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा
01 Jul 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
कोयनेतील साठ्यात दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ
07 Jul 2025
स्वच्छतेचे महत्त्व ठसवणारा ‘अवकारीका’ चित्रपट १ ऑगस्टला पडद्यावर
02 Jul 2025
हिमाचल प्रदेशात पावसाचे ४३ बळी; ३७ बेपत्ता
05 Jul 2025
पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!