E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा
Wrutuja pandharpure
01 Jul 2025
पुणे
: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या दोघांना २० वर्षे सक्तमजुरी व मुलीच्या अपहरण प्रकरणात तिच्या मैत्रिणीसह दोघांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सत्र न्यायाधीस ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला.
अत्याचार प्रकरणात रिजवान इक्राबद्दीन अन्सारी (वय ३५, रा. उत्तमनगर) व दशरथ आत्माराम चव्हाण (वय २२, वडगाव बुद्रुक) यांना २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी रिजवानला १३ हजार ५०० रुपये, तसेच दशरथला दहा हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. मुलीच्या अपहरण प्रकरणात मैत्रिण उज्ज्वला रविंद्र आतकरे (वय २३, सिंहगड रस्ता) आणि साजिद बुंदु अन्सारी (वय २६, रा. एरंडवणे) यांना १० वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली आहे. आरोपी उज्वलास साडेसात हजार आणि साजिदला तीन हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे दंडापैकी पीडितेला २० हजार रुपये देण्यात यावेत, असे देखील न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
पीडित मुलीची उज्ज्वला मैत्रिण आहे. घरी जात असताना तिचा मोबाईल रस्त्यावर पडला. त्यामुळे घरातील सदस्य ओरडतील, अशी भिती मनात होती. त्यानंतर ती मैत्रिण उज्ज्वलाकडे गेली. मोबाईल दुरूस्त करुन देते, असे सांगून उज्ज्वलाने मित्र रिजवान आणि दशरथ यांना घरी बोलाविले. त्यानंतर पीडित मुलीला धमकावून दशरथने तिच्यावर बलात्कार केला. मोबाईल दुरुस्तीसाठी तळेगाव दाभाडे येथे जावे लागेल, असे त्यांनी मुलीला सांगितले. मुलीने नकार दिल्यानंतर तिला धमकाविण्यात आले. रिक्षातून आरोपी साजीद आणि रिजवान मुलीला घेऊन भूगाव येथील एका लॉजवर गेले. रिजवानने तिच्यावर अत्याचार केला. तिने विरोध केल्यानंतर रिजवानने मारहाण केली. साजीद आणि उज्ज्वलाने धमकावले, असे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणाचा दत्तवाडी पोलिसांनी तपास करुन सर्व आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी बाजू मांडली. पीडित मुलीची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली.
Related
Articles
एलएलबी, बीएड आणि एमएड अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ
20 Jul 2025
सरकारमधील लोकांना सत्तेचा माज
19 Jul 2025
ब्लाईंडनेस : राजकीय आणि मनोवैज्ञानिक गुंत्यांची उकल
26 Jul 2025
रिक्षा, कॅब चालकांचा बंद मंगळवारपर्यंत स्थगित
20 Jul 2025
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
पीएमपीएमएलच्या सेवाज्येष्ठ कर्मचार्यांबाबत दिलासादायक निर्णय
24 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर