E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
MS धोनीसह ICC Hall Of Fame मधील ११ भारतीयांमध्ये २ महिला क्रिकेटर्सचाही समावेश
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) लंडनमधील एका खास समारंभात ICC हॉल ऑफ फेममध्ये नव्या सात प्रतिष्ठित खेळाडूंची यादी जाहीर केली. भारताच्या महेंद्रसिंह धोनीसह यावर्षी हाशिम आमला, मॅथ्यू हेडन, ग्रॅमी स्मिथ आणि डॅनियल व्हेटोरी या पाच पुरुष खेळाडूंसह महिला गटातून पाकिस्तानची क्रिकेटर सना मीर आणि इंग्लंडची सारा टेलर यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. या नव्या ७ चेहऱ्यांसह 'ICC हॉल ऑफ फेम'मध्ये समाविष्ट झालेल्या खेळाडूंची संख्या आता १२२ वर पोहचली आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आयसीसी 'हॉल ऑफ फेम'साठी निवड केली. आयसीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे की, 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' (डब्ल्यूटीसी) फायनल २०२५ च्या आधी ९ जून रोजी एकूण सात दिग्गज खेळाडूंना 'आयसीसी हॉल ऑफ फेम'मध्ये समाविष्ट केले जाईल. ७ दिग्गज खेळाडूंमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे, ज्यांना विशेष सन्मान देण्यात येईल.
हा सन्मान ‘अ डे विथ द लीजेंड्स’ नावाच्या एका विशेष कार्यक्रमाचा भाग असेल, ज्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. येथे जगभरातील चाहते क्रिकेटच्या या महान दिग्गजांना सन्मानित होताना पाहणार आहेत. भारताचा कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी हा टीम इंडियाचा ११वा भारतीय खेळाडू ठरलाय, ज्याची आयसीसी हॉल ऑफ फेमसाठी निवड झाली आहे.
ICC Hall of Fame म्हणजे काय?
'आयसीसी हॉल ऑफ फेम' हा क्रिकेटचा सर्वोच्च सन्मान आहे. क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासात आपल्या कामगिरीची छाप उमटवणाऱ्या दिग्गजांच्या कामगिरीचे कौतुक म्हणून केला जातो. याची सुरूवात २ जानेवारी २००९ रोजी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) च्या सहकार्याने करण्यात आली.
आयसीसीच्या या सन्मानाचे मानकरी ठरण्यासाठी फलंदाजाने किमान ८००० आंतरराष्ट्रीय धावा आणि २० शतके केलेली असावीत. ही कामगिरी कसोटी किंवा एकदिवसीय कोणत्याही स्वरूपातील असू शकते किंवा फलंदाजाची सरासरी ५० पेक्षा जास्त असावी. तर गोलंदाजांच्या बाबतीत ज्यांनी एक दिवसीय किंवा कसोटी प्रकारामध्ये २०० अधिक बळींचा आकडा गाठलेला असावा.
'आयसीसी हॉल ऑफ फेम' हा कोणत्याही क्रिकेटपटूला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाच वर्षांनी दिला जाणारा सन्मान आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने १४ नोव्हेंबर २०१३ रोजी निवृत्तीची घोषणा केली. तर सचिन तेंडुलकरची २०१९ मध्ये 'हॉल ऑफ फेम'साठी निवड करण्यात आली.
आतापर्यंत ११५ खेळाडूंना 'आयसीसी हॉल ऑफ फेम'साठी निवड केली आहे. दुबई येथे झालेल्या आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यापूर्वी अलिकडेच हा समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अॅलिस्टर कुक, एबी डिव्हिलियर्स आणि नीतू डेव्हिड यांचा सन्मान करण्यात आला.
अंपायरसह प्रशासकाचाही केला जाऊ शकतो सन्मान
'ICC हॉल ऑफ फेम' साठी पात्रता निकष ठरलेले असले तरी क्रिकेटच्या मैदानातील अविश्वसनीय कामगिरीसाठी संबंधित पात्रता पार केली नसली तरी काही खेळाडूंचा विचार केला जाऊ शकतो. याशिवाय मैदानातील पंच आणि प्रशासकीय विभागातील मंडळींनाही क्रिकेटमधील योगदानासाठी सन्मानित केले जाऊ शकते.
Related
Articles
थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण
05 Jul 2025
जनसुनावणीमुळे पीडितांंच्या चेहर्यांवर आनंद
03 Jul 2025
बेल्हे परिसर हिरवाईने नटला
08 Jul 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
खोड जिरलेली नाही...(अग्रलेख)
02 Jul 2025
थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण
05 Jul 2025
जनसुनावणीमुळे पीडितांंच्या चेहर्यांवर आनंद
03 Jul 2025
बेल्हे परिसर हिरवाईने नटला
08 Jul 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
खोड जिरलेली नाही...(अग्रलेख)
02 Jul 2025
थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण
05 Jul 2025
जनसुनावणीमुळे पीडितांंच्या चेहर्यांवर आनंद
03 Jul 2025
बेल्हे परिसर हिरवाईने नटला
08 Jul 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
खोड जिरलेली नाही...(अग्रलेख)
02 Jul 2025
थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण
05 Jul 2025
जनसुनावणीमुळे पीडितांंच्या चेहर्यांवर आनंद
03 Jul 2025
बेल्हे परिसर हिरवाईने नटला
08 Jul 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार
03 Jul 2025
खोड जिरलेली नाही...(अग्रलेख)
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
कोण आहेत जोहरान ममदानी ?
4
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
शेअर बाजार घसरला