E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
Wrutuja pandharpure
03 Jul 2025
बर्मिंगहॅम
: इंग्लंड विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या भात्यातून आणखी एक कडक खेळी पाहायला मिळाली. पहिल्या कसोटी सामन्यातील शतकवीरानं दुसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात लंच आधी अर्धशतक साजरे केले. पहिल्या डावातील 22 व्या षटकात जोस टंगच्या गोलंदाजीवर बॅक टू बॅक चौकार मारत यशस्वीनं 59 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यशस्वी इंग्लंडच्या गोलंदाजांना तर नडलाच, पण तो इंग्लंडच्या कॅप्टनलाही भिडल्याचे दिसून आले. मैदानातील दोघांच्यातील शाब्दिक वादही चर्चेचा विषय ठरतो.
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील 17 व्या षटकात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला भिडल्याचे दिसून आले. मैदानात हे दोन्ही खेळाडू एकमेकांना काहीतरी म्हणताना दिसले. दोघांच्यातील हे दृश्य दाखवणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेन स्टोक्सच्या या षटकात यशस्वी जैस्वालनं एक खणखणीत चौकारही मारला.
भारतीय संघाने अवघ्या 15 धावांवर पहिली विकेट गमावल्यावर यशस्वी जैस्वालनं पुन्हा एकदा आपल्या भात्यातील खास नजराणा पेश करत अर्धशतक ठोकले. लोकेश राहुल अवघ्या 2 धावांवर बाद झाल्यावर त्याने करुण नायरसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. दोघांनी दुसर्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी रचली. करुण नायरच्या रुपात टीम इंडियाने 95 धावांवर दुसरी विकेट गमावली. लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाने 25 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात 98 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 62 धावांवर नाबाद खेळत होता. सलग दुसर्या कसोटी सामन्यात दुसर्या शतकाचा डाव साधण्याची संधी त्याच्याकडे आहे.
Related
Articles
गणेश उत्सवात परवानगीची वेगळी गरज नाही
21 Jul 2025
गुंडगिरी करून विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग
22 Jul 2025
आम्हाला रोहित-विराटची उणीव भासते : राजीव शुक्ला
23 Jul 2025
पूंछमध्ये शाळेवर दरड कोसळून विद्यार्थी ठार
22 Jul 2025
सिद्धेश, निकिता, कृष्णा, मनिषा, रविना, ईश्वर यांना विजेतेपद
25 Jul 2025
केंद्र सरकारकडून दोन रेल्वेमार्गांना मंजुरी
20 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)