E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
Wrutuja pandharpure
31 May 2025
चाकण
, (वार्ताहर) : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या हगवणे कुटुंबावर आता आर्थिक फसवणुकीचे आरोपही होत आहेत. शशांक हगवणे याच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. प्रशांत येळवंडे (रा.निघोजे,ता.खेड) यांनी जेसीबी खरेदीच्या व्यवहारात तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे.
प्रशांत येळवंडे आणि शशांक हगवणे यांच्यात २५ लाख रुपये किमतीच्या जेसीबी खरेदीसंदर्भात व्यवहार ठरला होता. त्यानुसार, प्रशांत यांनी सुरुवातीला शशांक हगवणेला ५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. पुढील अटीप्रमाणे जेसीबीसाठी घेतलेल्या बँक कर्जाचे हप्ते प्रशांत हे दरमहा ५० हजार रुपये शशांक हगवणेला देत होते. हा व्यवहार विश्वासावर आधारित असतानाही शशांकने हप्ते न भरल्यामुळे बँकेने जेसीबी जप्त केला. दरम्यान, शशांक हगवणेने जेसीबी बँकेकडून सोडवून आणल्याचा दावा केला. मात्र, प्रशांत येळवंडे यांनी जे पैसे दिले होते. त्यापैकी एकाही रुपयाची परतफेड करण्यात आली नाही. या व्यवहारातून प्रशांत यांची एकूण ११ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हगवणे कुटुंबीयांवर वाढत चालला दबाव
या प्रकरणामुळे आधीच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. शशांक हगवणेवर याआधी गर्भवती पत्नीस छळ, हुंडा मागणी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल झाला असून तो कोठडीत आहे. यातच आता आर्थिक फसवणुकीचे नवे प्रकरण उघड झाल्यामुळे पोलिसांच्या तपासाची व्याप्ती अधिक वाढणार असल्याचे संकेत आहेत.
Related
Articles
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसाठी बीएसएफची तुकडी काँगोला रवाना
03 Jun 2025
इलेक्ट्रॉनिक्स घटकनिर्मिती योजनेला प्रतिसाद
31 May 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
अतिक्रमणे हटवून आरक्षित जागा ताब्यात घ्या
29 May 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार