E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
’कुकडी’च्या पाणी साठ्यात वाढ
Samruddhi Dhayagude
29 May 2025
बेल्हे,(प्रतिनिधी): गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत धरणाच्या पाणीसाठ्यात ०.७८५ टीएमसी वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात कुकडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची ही पहिलीच घटना असून कुकडी प्रकल्पात आजअखेर २.७६७ टीएमसी (९.३३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
जुन्नर तालुक्यात सात मेपासून ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन न झाल्याने व मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष वेलींवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन उन्हाळ्यात प्रथमच ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार जुन्नर तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने सुरू केले आहेत.
कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील चार ते पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे. सात मेपासून आज सकाळी सहा वाजेपर्यंत कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी २८५ मिलिमीटर पाऊस झाला असून कुकडीच्या पाणी साठ्यात एकूण ०.७८५ टीएमसी वाढ झाली आहे. यापैकी सर्वात जास्त ३८५ मिलिमीटर पाऊस डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात झाल्याने डिंभे धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात एकूण ०.५७८ टीएमसी वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात कुकडी प्रकल्पाच्या पाण्यासाठी वाढ होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी सांगितले. मागील २४ तासात कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस मिलिमीटर (कंसात पाणी साठ्यात झालेली वाढ दशलक्ष घनफूट) : वडज : ६० (२९.९८), माणिकडोह : ३० (७४.४१) पिंपळगाव जोगे : १८ (४४.७२), डिंभे : ५० (४०७.७४), चिल्हेवाडी : १३(२५).
Related
Articles
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
07 Jun 2025
सवांग यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी पटकाविले विजेतेपद
04 Jun 2025
कोयनेतून विक्रमी वीजनिर्मिती
07 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
07 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
07 Jun 2025
सवांग यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी पटकाविले विजेतेपद
04 Jun 2025
कोयनेतून विक्रमी वीजनिर्मिती
07 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
07 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
07 Jun 2025
सवांग यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी पटकाविले विजेतेपद
04 Jun 2025
कोयनेतून विक्रमी वीजनिर्मिती
07 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
07 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
07 Jun 2025
सवांग यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी पटकाविले विजेतेपद
04 Jun 2025
कोयनेतून विक्रमी वीजनिर्मिती
07 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
07 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका