E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
वृत्तवेध
एप्रिलमध्ये भारताच्या कोअर सेक्टरच्या वाढीचा दर आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. कोअर सेक्टरमध्ये कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, वीज, सिमेंट, स्टील आणि खत यांचा समावेश असतो. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये एप्रिलमध्ये ०.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एप्रिलमध्ये सिमेंट क्षेत्राची वाढ ६.७ टक्के होती. ती मार्चमधील १२.२ टक्के वाढीपेक्षा खूपच कमी आहे. एप्रिल महिन्यात स्टील क्षेत्राची वाढ केवळ तीन टक्के राहिली. मार्चमध्ये या क्षेत्रामध्ये ९.३ टक्के वाढ नोंदवली गेली होती. त्याचप्रमाणे, नैसर्गिक वायू क्षेत्रात एप्रिलमध्ये केवळ ०.४ टक्के वाढ झाली तर मार्चमध्ये ती १२.७ टक्के होती. तथापि, एप्रिलमध्ये कोळसा क्षेत्राची वाढ ३.५ टक्के झाली. मार्चमधील १.६ टक्के वाढीपेक्षा ती जास्त आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कोअर सेक्टर महत्त्वाचे आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात मुख्य क्षेत्राचे योगदान सुमारे ४१ टक्के आहे. एप्रिलमधील मंदावलेल्या निकालांचा परिणाम एकूण ‘आयआयपी’वर होईल, जो मे महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, वीज, सिमेंट, स्टील आणि खत ही आठ क्षेत्रे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यामध्ये वाढ किंवा घसरण संपूर्ण अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम करते.
अधिकृत आकडेवारीवरून दिसून येते की एप्रिल महिन्यात कच्चे तेल, रिफायनरी उत्पादन विभाग, खतांमध्ये घट झाली आहे. या तिन्ही क्षेत्रांमध्ये अनुक्रमे २.८ टक्के, ४.५ टक्के आणि ४.२ टक्के घट झाली आहे. वीज क्षेत्रात फक्त एक टक्का वाढ नोंदवली गेली आहे, जी मार्चमधील ७.५ टक्के वाढीपेक्षा खूपच कमी आहे.
Related
Articles
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
इराणवरील हल्ल्याचा निर्णय दोन आठवड्यांत : ट्रम्प
21 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
देशातील बहुतेक संस्थांमध्ये एआय प्रमुखांच्या नेमणुका
21 Jun 2025
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
इराणवरील हल्ल्याचा निर्णय दोन आठवड्यांत : ट्रम्प
21 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
देशातील बहुतेक संस्थांमध्ये एआय प्रमुखांच्या नेमणुका
21 Jun 2025
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
इराणवरील हल्ल्याचा निर्णय दोन आठवड्यांत : ट्रम्प
21 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
देशातील बहुतेक संस्थांमध्ये एआय प्रमुखांच्या नेमणुका
21 Jun 2025
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
इराणवरील हल्ल्याचा निर्णय दोन आठवड्यांत : ट्रम्प
21 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
देशातील बहुतेक संस्थांमध्ये एआय प्रमुखांच्या नेमणुका
21 Jun 2025
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला