E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मावळातील एक हजार शेतकरी करणार प्रमाणित इंद्रायणी भाताची लागवड
Wrutuja pandharpure
20 May 2025
वडगाव मावळ
: मावळ तालुक्यातील १ हजार शेतकरी येत्या खरीप हंगामात शुद्ध, प्रमाणित इंद्रायणी भाताची लागवड करणार असल्याची माहिती मावळ ऍग्रोचे संस्थापक तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली. शुद्ध, प्रमाणित इंद्रायणी भाताची लागवड करणार्या शेतकर्यांना मावळ ऍग्रो कडून बियाणे व सेंद्रिय खते पुरवली जाणार आहेत.
मावळ तालुका हा खरीप भात पीक घेण्यात राज्यात आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणावर पडणार्या पावसामुळे या ठिकाणी पावसावर येणारे खरीप भात पीक शेतकरी घेत असतात. तालुक्यामध्ये एकूण भात पीक लागवडी खाली १३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. अनुकूल वातावरणामुळे आणि भरपूर पावसामुळे या ठिकाणी इंद्रायणी सुवासिक भातपीक शेतकर्यांना चांगला आधार देऊन जाते. शेतकरी जवळ जवळ ९०% खरीपाच्या हंगामात भात पीक घेतात.मावळ ऍग्रो मागील दोन वर्षांपासून शेतकर्यांना शुद्ध, प्रमाणित इंद्रायणी बी- बियाणे देत आहे. सेंद्रिय शेतीसाठी शेतकर्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शेतकर्यांना बियाणांबरोबर सेंद्रिय खते देखील पुरवली जात असून पीक घेण्याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.
शेतकर्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या खरीप इंद्रायणी भाताची खरेदीही मावळ ऍग्रो कडून केली जाते. त्यासाठी शेतकर्यांना चांगला भाव दिला जातो. राज्य शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त दर शेतकर्यांना मिळत असल्याने शेतकरी इंद्रायणी भात पीक घेण्याकडे आकर्षित झाले आहेत. गेल्या वर्षी मावळ ग्रोने शुद्ध आणि प्रमाणित बियाणे राहुरी कृषी विद्यापीठाकडून आणून ते शेतकर्यांना वाटप केले होते. तर त्या बियांणापासून उत्पादित झालेले भात मावळ ऍग्रोने खरेदी करून ते शेतकर्यांना यावर्षी वाटप करणार आहेत.
मावळ तालुक्यातील विविध गावांमधील शेती विकास सोसायटींच्या मार्फत तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठा धोरणानुसार शेतकर्यांना कर्ज मिळवून देऊन इंद्रायणी भाताचे उत्पादन कसे वाढेल यासाठी देखील मावळ ऍग्रो प्रयत्न करत आहे.
मावळ तालुक्यातील शेतकर्यांनी शुद्ध, प्रमाणित बियाणे व सेंद्रिय खते वापरावीत यासाठी मावळ ऍग्रो पवन मावळ, नाणे मावळ व अंदर मावळ विभागात शेती विकास सोसायटी माध्यमातून इंद्रायणी भात पिकांबाबत जनजागृती करत आहेत. काही ठिकाणी सेंद्रिय खते कशी वापरावीत याबाबत माहिती व अभ्यास वर्ग घेतले जात आहेत.
Related
Articles
संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई
01 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
सीबीएसई पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
30 May 2025
शिवसृष्टी पाहण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी
04 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई
01 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
सीबीएसई पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
30 May 2025
शिवसृष्टी पाहण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी
04 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई
01 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
सीबीएसई पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
30 May 2025
शिवसृष्टी पाहण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी
04 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई
01 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
रशियात पूल कोसळल्याने दोन रेल्वे घसरल्या
02 Jun 2025
सीबीएसई पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
30 May 2025
शिवसृष्टी पाहण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी
04 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार