E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
Samruddhi Dhayagude
14 May 2025
जम्मू : भारत-पाकिस्तान युद्धविराम घोषणेनंतर ४८ तासांत दक्षिण काश्मीरातील शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. यात लश्कर-ए-तय्यबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.ही कारवाई १३ मे रोजी शोपियातील केल्लार इथल्या जंगलात सुरक्षा दलाने केली होती.
सीमेवरील गोळीबार बंद होताच सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांना ठेवण्याचे काम सुरू केले. त्यात मंगळवारी सकाळी शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्यात चकमक झाली. यात लश्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहीद कुट्टे आणि अदनान शफीसह ३ दहशतवादी मारले गेले. यातील तिसरा दहशतवादी अहसान-उल-हक शेख हा पुलवामातील रहिवासी आहे. या दहशतवाद्यांकडून दारुगोळा, हत्यारे जप्त करण्यात आली. त्यात एके ४७, मॅगजीन, ग्रेनेड आणि अन्य शस्त्रांचा समावेश आहे.
याबाबत जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी शोपिया जिल्ह्यातील केल्लर परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांकडून स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सैन्याचे २० राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ जवान तिथे दाखल झाले. परिसरात शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा यंत्रणांनी वेढा घातलाय समजताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा जवानांनीही चोख उत्तर दिले. या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचे ३ दहशतवादी मारले गेले.
लश्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि ए श्रेणीतला दहशतवादी होता कुट्टे
दक्षिण काश्मीरातील शोपिया जिल्ह्यात मारला गेलेला दहशतवादी शाहीद कुट्टे शोपियातील चोटीपोरा इथला रहिवासी आहे. मार्च २०२३ मध्ये तो लश्कर ए तय्यबा सहभागी झाला होता. तो लष्कराचा प्रमुख दहशतवादी होता. बऱ्याच दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता. दानिश रिसोर्टवर ८ एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता. या दहशतवादी हल्ल्यात जर्मनीचे २ पर्यटक आणि १ वाहनचालक जखमी झाला होता. १८ मे २०२४ मध्ये हिरपोरामध्ये भाजपा सरपंचाची हत्या करण्यात त्याचा कट होता. त्यानंतर ३ फेब्रुवारीला कुलगाम येथे आर्मी जवानाच्या हत्येची सुई त्याच्याकडे जात होती.
Related
Articles
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर
04 Jun 2025
बाजारात हिमालयातील फळांना मागणी
03 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर
04 Jun 2025
बाजारात हिमालयातील फळांना मागणी
03 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर
04 Jun 2025
बाजारात हिमालयातील फळांना मागणी
03 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर
04 Jun 2025
बाजारात हिमालयातील फळांना मागणी
03 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी