E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
टँकरमुक्ती केवळ स्वप्नच?
गेल्या मे महिन्यात महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसल्या. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात अंदाजे दोन हजार गावांमध्ये आणि आदिवासी पाडे, वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. तीव्र पाणीटंचाईमुळे हताश झालेले गावा-खेड्याकडचे लोक पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशांना वणवण भटकतात आणि गावात टँकर येताच हंडे कळशी घेऊन विहिरीवर प्रचंड गर्दी करतात. राज्यातील अनेक आदिवासी पाडे आणि गावात उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात. लोक टँकर कधी येणार याकडे चातकासारखी वाट पाहत बसलेले असतात. वास्तविक स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी अनेक सरकारी योजना असून त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. महाराष्ट्र टँकरमुक्त करून नळाद्वारे पाणी पुरविण्याची घोषणा केली होती. त्यालाही अनेक वर्षे उलटून गेली आहेत; पण अजूनही राज्य टँकरमुक्त झालेले नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र टँकरमुक्त करण्यासाठी पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
प्रदीप मोरे, मुंबई
हिंजवडीत वाहतूक कोंडी
केवळ दहा मिनिटांच्या मुसळधार पावसाने कथित आयटी पार्क हिंजवडीची वॉटर पार्क अशी दैना उडाली. त्यामुळे येथील काही आयटी कंपन्यांनी ’वर्क फ्रॉम होम’ करावे का? असा टोलात्मक प्रश्न प्रशासनाला विचारला आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर उभी राहिलेली बांधकामे तसेच प्रदीर्घ आणि कासवगतीने चाललेली मेट्रोची कामे, रस्ता काँक्रिटीकरण, पुरेशा पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध नसणे आदी कारणे या आयटी पार्कचे वॉटर पार्क होण्यामागे आहेत. हिंजवडी येथील वाहतूक कोंडी तर नित्याची बाब झाली आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील केवळ वाहतूक कोंडीमुळे ३७ कंपन्यांनी मागील काही वर्षात इतर राज्यांत पलायन केले आहे. तथापि झोपी गेलेले प्रशासन जागे कधी होणार? हाच एक लाख मोलाचा प्रश्न आहे.
बाळकृष्ण शिंदे, पुणे
लहान देश चीनच्या जाळ्यात!
कझाकस्तान, पाकिस्तान, मंगोलिया, अर्जेंटिना, ब्राझील, इंडोनेशिया यांसारख्या सुमारे ७५ देशांना चीनने ३५ अब्ज डॉलर्सची कर्ज देऊन आपल्या जाळ्यात ओढल्यासारखीच परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. गरीब देश आधीच गंभीर समस्यांना तोंड देत असतात, त्यांना दिलेल्या कर्जांची परतफेड करण्याच्या दबावाखाली दबले गेले आहेत; परंतु त्या कर्जांची परतफेड करताना या लहान देशांची द्विधा परिस्थिती होते. चीनकडून कर्जफेडीचा दबाव येत असतो. जेव्हा काही देशांना कर्जांची गरज होती, तेव्हा चीनने त्यांना कर्जे देणे बंद करून कर्जांच्या वसुलीची मागणी करणे सुरू केले. चीनने दिलेली कर्जे इतर कोणत्याही पाश्चात्य देशांपेक्षा मोठ्या रकमेची आहेत. कर्ज वसुलीच्या बदल्यात चीनला त्या कर्जबाजारी देशांवर आपले आधिपत्य गाजवून त्यांच्यावर आपली सत्ता स्थापन करून आर्थिकदृष्ट्या मजबूत असणार्या अमेरिकन, युरोपियन देशांवर काहीसे दडपण आणण्याचा प्रयत्न करणे शक्य होईल.
स्नेहा राज, गोरेगांव.
सकारात्मकता सर्वच दृष्ट्या हवी
केसरी (दि. १ जून)मधील पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर ही बातमी पुण्याहून विमान प्रवाशांसाठी खूपच दिलासादायक आहे. पुरंदर विमानतळाच्या ’उड्डाणाचा रनवे कुठपर्यंत दूर जाणार’ हे कळत नसताना आहे त्या पुणे विमानतळाचे रुपडे सुधारणे, तिथे प्रवाशांसाठी स्वस्तात नाश्त्याची सोय होणे आणि आता विमानांच्या उड्डाणसंख्येतही लष्करी हवाई दलाच्या उदार धोरणामुळे वाढ होणे या सकारात्मक बाबी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे सुकर झाल्या, ही पुणेकरांसाठी खूपच जमेची बाजू आहे. फक्त विमानतळापर्यंत जाण्यासाठी वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. पुणेकरांनी वाहतूक नियम पाळून रहदारीची कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत हे बरे.
श्रीपाद कुलकर्णी, पुणे
बस स्थानकांची दुरावस्था
राज्यातील जवळपास सर्वच बस स्थानकांची दुरावस्था झाली आहे. बस स्थानक परिसरात स्वच्छतेकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. बस स्थानकावर कचर्याचे ढीग जागोजागी साचलेले असतात. बस स्थानकावरील स्वच्छतागृह फक्त नावासाठी राहिलेले असून पुरुष फक्त स्वच्छतागृहाचा वापर करू शकतात. महिला स्वच्छतागृहाची अवस्था तर अत्यंत खराब झालेली आहे. अनेक बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. काही बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. ज्या ठिकाणी बसण्याची आसन व्यवस्था आहे तिथे पंखे, प्रकाश नाही. उन्हाळ्यात याचा प्रवाशांना खूप त्रास होतो. बस स्थानकाच्या भिंती गुटखा आणि पानाच्या थुंकीने नक्षीकाम केलेल्या आहेत. बस स्थानकाच्या कोपर्यात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. स्वारगेट बस स्थानकात झालेल्या घृणास्पद घटनेनंतर तरी परिवहन विभाग बोध घेऊन यात काही बदल करेल अशी अपेक्षा आहे.
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
Related
Articles
अरुणाचल प्रदेशात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा रुग्ण
03 Jul 2025
मस्क यांचा नवा पक्ष
07 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025
जागतिक बॉक्सिंग चषकात साक्षीला सुवर्णपदक
07 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या ज्येष्ठाची फसवणूक
05 Jul 2025
अरुणाचल प्रदेशात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा रुग्ण
03 Jul 2025
मस्क यांचा नवा पक्ष
07 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025
जागतिक बॉक्सिंग चषकात साक्षीला सुवर्णपदक
07 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या ज्येष्ठाची फसवणूक
05 Jul 2025
अरुणाचल प्रदेशात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा रुग्ण
03 Jul 2025
मस्क यांचा नवा पक्ष
07 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025
जागतिक बॉक्सिंग चषकात साक्षीला सुवर्णपदक
07 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या ज्येष्ठाची फसवणूक
05 Jul 2025
अरुणाचल प्रदेशात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा रुग्ण
03 Jul 2025
मस्क यांचा नवा पक्ष
07 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025
जागतिक बॉक्सिंग चषकात साक्षीला सुवर्णपदक
07 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या ज्येष्ठाची फसवणूक
05 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!