अरुणाचल प्रदेशात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा रुग्ण   

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यातील लुआक्सिम गावात बुधवारी आफ्रिकन स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळला. आसाममधील राष्ट्रीय डुक्कर संशोधन केंद्रात चाचणीसाठी पाठवलेल्या रक्ताच्या नमुन्यात या आजाराची पुष्टी झाली आहे.
    
कानुबारी मोबाइल व्हेटर्नरी युनिटचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गन्नो तायेंग म्हणाले, लाँगडिंगमधील पशुवैद्यकीय विभागाने आफ्रिकन स्वाइन फ्लूचाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत. बाधित क्षेत्रापासून 10 किलोमीटरचा परिसर पाळत ठेवण्यासाठी चिन्हांकित करण्यात आला आहे. संक्रमित आणि पाळत ठेवलेल्या क्षेत्रांमध्ये डुकरांची आणि त्यांच्या पिलांची हालचाल आणि वाहतूक यावर निर्बंध लादले आहेत. तसेच पुढील आदेशापर्यंत अधिसूचित क्षेत्रांमध्ये डुकरांची विक्री आणि कत्तल करण्यास मनाई केली आहे.

Related Articles