पुणे : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाची ४० हजारांची फसवणूक केल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात बुधवारी दुपारी घडली. याप्रकऱणी, ज्येष्ठ नागरिकानेस (रा. नाना पेठ) दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे बुधवारी (२ जुलै) दुपारी शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकातील (सेव्हन लव्हज चौक) एका बँकेच्या एटीएमध्ये गेले होते. त्यावेळी, एक चोरटा त्यांच्या पाठोपाठ एटीएममध्ये शिरला. तक्रारदार यांना मदत करण्याच बहाण्याने त्यांच्याकडून डेबीट कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. ज्येष्ठाच्या डेबीट कार्डचा वापर न करता. चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्ड वापरले. पैसे न बाहेर पडल्याने चोरट्याने तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी केली. त्यानंतर, चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्ड ज्येष्ठ नागरिकाला दिले. पैसे न मिळाल्यामुळे ते घरी गेले. तक्रारदार घरी आल्यानंतर त्यांच्या खात्यातून ४० हजारांची रोकड लांबल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक वळसंग याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Fans
Followers