E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांचे प्रतिपादन
पुणे : सध्याच्या बालसाहित्यातून वास्तवता मांडली जात असली तरी त्यातून रम्यता व कल्पकता हरवत चालली जात आहे. मात्र, ज्योती उटगीकर-देशपांडे लिखित ‘आधुनिक जंगल’ या बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी केले.उत्कर्ष प्रकाशनतर्फे ‘आधुनिक जंगल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लोकमान्य नगरमधील रुईया मूकबधीर विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जोशी बोलत होत्या. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, स्नेह सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर, प्रकाशक सु. वा. जोशी, प्राचार्य श्याम भुर्के, एकपात्री कलाकार बंडा जोशी मंचावर होते. कविता वाचनातून मुलांवर शब्दसंस्कार होतात, असे सांगून मृणालिनी कानिटकर-जोशी म्हणाल्या, बालवयात मुलांना चांगले, सकस साहित्य वाचायला मिळाल्यास मुलांची जडणघडण चांगल्या माणसात होईल.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ‘आधुनिक जंगल’ या बालकविता संग्रहातून जुन्याचे आधुनिकतेशी संधान साधले गेले आहे. लहान मुलांसाठी साहित्यनिर्मिती करणे ही फार अवघड गोष्ट असते. मुलांच्या अंतरंगात शिरून व्यक्त व्हावे लागते. बालसुलभ कुतुहलता, जिज्ञासा असावी लागते. ज्योती उटगीकर-देशपांडे यांनी तन्मयतेतून लिखाण केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काव्यामुळेच मिळाला असल्याचे सांगून श्याम भुर्के म्हणाले, ज्योती उटगीकर-देशपांडे यांच्या कविता अंतर्मुख करायला लावणार्या आहेत.
बंडा जोशी म्हणाले, मराठी वाचनासाठी मुलांना उद्युक्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे शाळांमध्ये बालकवितांच्या वाचनाचे कार्यक्रम व्हायला हवेत. सु. वा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. अंजली अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.
Related
Articles
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
07 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025
खंबाटकी घाटात मालमोटारीला आग
06 Jul 2025
डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान
02 Jul 2025
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
07 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025
खंबाटकी घाटात मालमोटारीला आग
06 Jul 2025
डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान
02 Jul 2025
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
07 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025
खंबाटकी घाटात मालमोटारीला आग
06 Jul 2025
डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान
02 Jul 2025
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
07 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025
खंबाटकी घाटात मालमोटारीला आग
06 Jul 2025
डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!