पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्‍यावर   

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौर्‍यावर रवाना झाले. ब्राझिल येथे होणार्‍या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ते अन्य चार देशांचा दौरा करणार आहेत. पाच देशांमध्ये घाना, त्रिनिनाद अँड टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामेबिया यांचा समावेश आहे. 2 ते 9 जुलैपर्यंत त्याचा दौरा आहे. दौर्‍यात ते प्रथम घाना देशाला भेट देणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य देशांचा दौरा करत ब्राझिलला पोहोचणार आहेत. तेथे ब्रिक्स देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत.

 

 

Related Articles