E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यात मागील दोन आठवड्यांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. अखेर मस्क यांनी बुधवारी नरमाईची भूमिका घेतली. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांच्याबाबत केलेल्या पोस्ट संदर्भात मला पश्चाताप होत आहे, मी जरा जास्तच बोलून गेलो, असे मस्क यांनी म्हटले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी मस्क यांनी ट्रम्प यांच्या खर्च आणि कर कपात विधेयकावर टीका करत हे बिल खर्चिक असून, त्यामुळे राजकोषीय तोटा वाढेल, असे म्हटले होते. त्यानंतर मस्क हे ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडले. तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक वाद सुरू आहेत. दोन्ही नेते एकमेकांविरोधात समाजमाध्यमावर अतिशय टोकाच्या पोस्ट करत आहेत. मस्क यांनी ट्रम्प यांचे जेफ्री एपस्टाईनशी असलेले जुने संबंध उकरुन काढले. त्यानंतर हे प्रकरण इतके वाढले की, ट्रम्प यांनी उघडपणे मस्कच्या कंपन्यांसोबतचे सरकारी करार आणि अनुदान संपवण्याचा इशारा दिला.
त्यानंतर बुधवारी मस्क यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्याबद्दल आपण केलेल्या काही पोस्ट या चुकीच्या होत्या. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांच्याबाबत केलेल्या पोस्टबद्दल मला पश्चात्ताप होत आहे. ते जरा जास्तच झाले.
दरम्यान, ट्रम्प सरकारच्या खर्च आणि कर कपात विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरील कर सूट संपवण्याचा प्रस्ताव आहे. बायडेन सरकार नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर ७ हजार ५०० ची कर सूट देत असे. ट्रम्प सरकार ती सवलत देणार नाही. याशिवाय २००९ ते २०२५ दरम्यान २ लाख इलेक्ट्रिक वाहने विकलेल्या कंपन्यांना सवलत मिळणार नाही. मस्क यांच्या टेस्लासाठी हे नुकसानीचे होते. त्यामुळे त्यांनी या विधेयकाला विरोध केला होता.
Related
Articles
भारतीय संघाचा बांगलादेशाचा दौरा रद्द होणार?
05 Jul 2025
‘हिंजवडी आयटी पार्क’मधील आयटीयन्ससाठी मुख्यमंत्री घेणार आढावा बैठक
08 Jul 2025
तामिळनाडूत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या शाळेच्या बस आणि रेल्वेचा अपघात
08 Jul 2025
हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी
02 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला