‘हिंजवडी आयटी पार्क’मधील आयटीयन्ससाठी मुख्यमंत्री घेणार आढावा बैठक   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीलगत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘हिजवडी आयटी पार्क’ला समस्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आता राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. 
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, संबंधित विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. हिंजवडी आयटी पार्क यावर्षी पहिल्याच पावसात अक्षरश: ‘वॉटर पार्क’ झाला. वाहतूक कोंडी, पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव आणि वीज समस्यांमुळे या आयटी पार्कमधील आयटीयन्स आणि विविध कंपन्यांचे अधिकारी अक्षरश: हैराण झाले आहेत. 

Related Articles