E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
ऑस्ट्रेलियाला आफ्रिकेचे आव्हान
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. ११ जून रोजी दोन्ही संघ लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात कसोटीतील चॅम्पियन होण्याच्या इराद्याने मैदानात उतरलीत. गत हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला पराभूत करत ही स्पर्धा जिंकली होती.ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियनचा आपला रुबाब कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.दुसरीकडे टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच फायनल खेळताना दिसेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील ११ ते १५ जून या कालावधीत रंगणार्या या मेगा फायनल लढती वेळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी आयसीसीने फायनल लढतीसाठी १६ जून हा एक राखीव दिवसही ठेवला आहे. पण त्यातूनही जर सामना अनिर्णित राहिला तर काय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसर्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अव्वलस्थानासह फायनलचं तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ हा दुसर्या स्थानासह फायनलसाठी पात्र ठरला. जर अंतिम लढत अनिर्णित राहिली तर आयसीसीच्या १६.३.३ नियमानुसार, दोन्ही संघांना संयुक्तरित्या जेतेपद दिले जाईल. एवढेच नाही तर बक्षीसाची रक्कमही समान पद्धतीने वाटली जाईल.आयसीसीने स्पर्धेतील फायनल आधीच विजेत्या आणि उप विजेत्या संघासह अन्य संघांना मिळणार्या बक्षीसांची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ३.६ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार, जवळपास ३०.७ कोटी एवढे रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे.
उप विजेत्याला २.१६ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार, जवळपास १८.५३ कोटी रुपये बक्षीस रोख स्वरुपात दिले जाणार आहे.दक्षिण आफ्रिकेचा संघ : टोनी डी झॉर्झी , रायन रिकल्टन, एडन माक्ररम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरिन, वियान मुल्डर, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी.ऑस्ट्रेलियन संघ : उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमरून ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लियोन, मॅट कुहनेमॅन.
Related
Articles
हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला
03 Jul 2025
कचरा निर्मूलनासाठी पेटवलेला कचरा उठला नागरिकांच्या जीवावर
09 Jul 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
कन्नड तहसील कार्यालयासमोर नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली
03 Jul 2025
सातार्यात जनआक्रोश मोर्चा
04 Jul 2025
गोंदीमध्ये तब्बल ३५ वर्षांनंतर एसटी
08 Jul 2025
हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला
03 Jul 2025
कचरा निर्मूलनासाठी पेटवलेला कचरा उठला नागरिकांच्या जीवावर
09 Jul 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
कन्नड तहसील कार्यालयासमोर नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली
03 Jul 2025
सातार्यात जनआक्रोश मोर्चा
04 Jul 2025
गोंदीमध्ये तब्बल ३५ वर्षांनंतर एसटी
08 Jul 2025
हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला
03 Jul 2025
कचरा निर्मूलनासाठी पेटवलेला कचरा उठला नागरिकांच्या जीवावर
09 Jul 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
कन्नड तहसील कार्यालयासमोर नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली
03 Jul 2025
सातार्यात जनआक्रोश मोर्चा
04 Jul 2025
गोंदीमध्ये तब्बल ३५ वर्षांनंतर एसटी
08 Jul 2025
हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमला
03 Jul 2025
कचरा निर्मूलनासाठी पेटवलेला कचरा उठला नागरिकांच्या जीवावर
09 Jul 2025
यशस्वी जैस्वालचे संयमी अर्धशतक
03 Jul 2025
कन्नड तहसील कार्यालयासमोर नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली
03 Jul 2025
सातार्यात जनआक्रोश मोर्चा
04 Jul 2025
गोंदीमध्ये तब्बल ३५ वर्षांनंतर एसटी
08 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण